'चला हवा येऊ द्या'मध्ये येणार सचिन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

सचिनच्या सोबत त्याची पत्नी अंजली, त्याचे भाऊ नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर, बहीण सविता तेंडुलकर, तसेच त्याचे मित्र अतुल रानडे, जगदीश चव्हाण आणि अजित भुरे हेही चला हवा येऊ द्या च्या सेटवर आवर्जून हजर असणार आहेत.

पुणे - झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' च्या आगामी भागात क्रिकेटजगताचं दैवत मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर येणार आहे.  

या भागात सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. गप्पांची ही अनोखी मैफिल २२-२३ मे रोजी सोमवार आणि मंगळवारच्या भागात रसिकांना झी मराठीवर अनुभवता येणार आहे.

यापूर्वी आमीर खान, सलमान, शाहरुख, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रविना, नाना पाटेकर, विद्या बालन हे "चला हवा येऊ द्या" चे जबरदस्त फॅन झाले. आता बारी सचिनची आहे. ही गप्पांची मैफल निलेश साबळे रंगवणार आहे. या गप्पांमध्ये आपल्या कुटुंबाविषयी, गुरूंविषयी तसेच आपल्या सहकाऱ्यांबाबत सचिन भरभरून बोलला आहे. 

सचिनच्या सोबत त्याची पत्नी अंजली, त्याचे भाऊ नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर, बहीण सविता तेंडुलकर, तसेच त्याचे मित्र अतुल रानडे, जगदीश चव्हाण आणि अजित भुरे हेही चला हवा येऊ द्या च्या सेटवर आवर्जून हजर असणार आहेत.

Web Title: Sachin Tendulkar is in Chala hawa yavu dya