अभिनेत्री कुब्रा सैतचं खळबळजनक विधान; म्हणाली,'शाळेतल्या शिक्षकांनीच...' Kubra Sait | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sacred Games Fame Kubra Sait revealed secret about her school teachers, Shares Her Struggles and life Journey

अभिनेत्री कुब्रा सैतचं खळबळजनक विधान; म्हणाली,'शाळेतल्या शिक्षकांनीच...'

Kubra Sait: नेटफ्लिक्सची सिरीज 'सेक्रेड गेम्स'मधील अभिनयासाठी समिक्षकांकडून पाठ थोपटवून घेणारी अभिनेत्री कुब्रा सैत(Kubra Sait) स्वतः एक लेखिका देखील आहे. तिनं 'रेडी','सुलतान','गली बॉय','डॉली किट्टी', 'वो चमकते सितारे] आणि 'Rk/RKay' सारख्या सिनेमांतून काम केलं आहे. कुब्रा सैतची 'ओपन बुक: नॉक क्वाइट ए मेमॉयर' ही बायोग्राफी या वर्षाच्या सुरुवातीला प्रकाशित करण्यात आली आहे.(Sacred Games Fame Kubra Sait revealed secret about her school teachers, Shares Her Struggles and life Journey)

हेही वाचा: 'होऊ दे चर्चा,मी स्वतः ४ दिवसांनी..' बिग बॉस मराठी विषयी सिद्धार्थचा खुलासा

कुब्राची कहाणी खूपच इंट्रेस्टिंग आहे. कु्ब्रानं आपल्या पुस्तकात अनेक गोष्टी खूप विस्तारीतपणे सांगितल्या आहेत. एक दिवस कुब्रा जेव्हा बान्द्रयातील एका शॉपमध्ये गेली होती, त्यादरम्यान तिची भेट संगीतकार अंकुर तिवारी आणि स्वानंद किरकिरे सोबत झाली होती. काही वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि सैत निघून गेली. त्याच दिवशी संध्याकाळी तिवारीनं तिला एक मेसेज पाठवला,'माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे. मला वाटतं तू तुझ्याकडून १०० टक्के द्यावंस'.

हेही वाचा: 'सगळी कामं फाट्ट्यावर मारून चावट चॅनेलवर जा..' असं का म्हणतोय संतोष जुवेकर?

काही आठवड्यानंतर तिवारीनं पुन्हा सैतची भेट घेतली आणि तिला म्हणाला,'अनुराग कश्यपचा फोन येईल. त्याला एका भूमिकेसाठी अभिनेत्री हवी आहे'. तेव्हा अनुराग कश्यपनं भूमिकेसाठी तिवारीला नाव सुचव असं म्हटलं होतं आणि तिवारीच्या तोंडावर पटकन सैतचं नाव आलं होतं. आणि मग सैतला प्रोजेक्ट मिळत गेले.

हेही वाचा: समंथापासून विभक्त,पुन्हा प्रेमात; नागाचैतन्यनं चुप्पी तोडत दिली प्रतिक्रिया

आपल्या कारर्किर्दीत कुब्रा सैतला ट्रान्सजेंडरची भूमिका देखील साकारायला लागली होती. पण ती भूमिका तिनं ज्या पद्धतीनं निभावली त्यामुळे अभिनेत्री म्हणून ती चर्चेत आली. कुब्रानं तिच्या पुस्तकात आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलही अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. तिनं आपल्या आई-वडीलांविषयी सांगितलं आहे की,''त्यांच्यातील नातं चांगलं नव्हतं. त्यामुळेच तिला असं नातं बनवायचं आहे जे तिच्या आई-वडीलांसारखं नसेल''.

हेही वाचा: Laal Singh Chaddha:आमिर विरोधात अतुल कुलकर्णीचा सूर; म्हणाला,'मला 2 वर्ष..'

याचवेळी तिनं आपल्या शाळेतील शिक्षकांविषयी देखील खळबळजनक विधानं केली आहेत. तिनं लिहिलं आहे की,''शाळेत शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतात पण माझ्या शाळेतील शिक्षकांनी माझ्यातील आत्मविश्वासाला संपवून टाकलं होतं. आपले शिक्षक जेव्हा आपल्याशी असे वागतात तेव्हा खूप हरल्यासारखं वाटतं. त्यानं माझं आयुष्य संपलं असतं पण मी वेळीच सावरले,संघर्ष केला आणि आज मी स्वतःला एका सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं''.

Web Title: Sacred Games Fame Kubra Sait Revealed Secret About Her School Teachers Shares Her Struggles And Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..