'आयुष्यात नवं प्रेम शोधतोयस का?',नागा चैतन्यने तोडली चुप्पी, म्हणाला... Naga Chaitanya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naga Chaitanya Reaction On Finding New Love..

'आयुष्यात नवं प्रेम शोधतोयस का?',नागा चैतन्यने तोडली चुप्पी, म्हणाला...

Naga Chaitanya: नागा चैतन्य(Naga Chaitanya) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हे साऊथचे स्टार आणि एकेकाळचे लव्हबर्डस गेल्या वर्षीच विभक्त झाले आहेत. आणि काही दिवसांपूर्वीच अभिनेत्यानं आपण आयुष्यात नव्या प्रेमाचा शोध घेत आहोत असं मोठं विधान केलं होतं.(Naga Chaitanya Reaction On Finding New Love..)

हेही वाचा: Laal Singh Chaddha:आमिर विरोधात अतुल कुलकर्णीचा सूर; म्हणाला,'मला 2 वर्ष..'

प्रेम कधीच संपत नाही यावर नागा चैतन्यचा विश्वास आहे. त्याच्या म्हणण्यानुसार,''जसं जिवंत राहण्यासाठी श्वास नीट चालणं महत्त्वाचं असतं,तसंच आयुष्य नीट चालण्यासाठी प्रेम महत्त्वाचं असतं. आपल्याला प्रेमाची गरज पावलोपावली पडते, ते मिळणं आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं आणि तेच आपल्याला खूप स्ट्रॉंग बनवतं''. नागा चैतन्य एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रेमाविषयी भरभरुन बोलला.

हेही वाचा: Madhubala यांच्या बायोपिकला बहिण मधुर भूषणचा नकार, आता निर्माते म्हणतायत...

नागा चैतन्य आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. आणि सध्या याच सिनेमाच्या प्रमोशन मध्ये तो बिझी आहे. पण या प्रमोशनच्या निमित्तानं जेवढ्या मुलाखती झाल्या त्यामध्ये त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी वरनं म्हणजे समंथावरुनच त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडलं गेलं. तेव्हा नागा म्हणाला देखील,''मी लाल सिंग चड्ढा या माझ्या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. आणि मला आता तुम्ही विषय सोडून प्रश्न विचारताय याचा खूप कंटाळा आला आहे''. तो त्या मुलाखतीत हे बोलायला मात्र नक्कीच विसरला नाही की,त्याच्या मनात समंथाविषयी आजही आदर आहे आणि तो कायम राहील.

हेही वाचा: 'होऊ दे चर्चा,मी स्वतः ४ दिवसांनी..' बिग बॉस मराठी विषयी सिद्धार्थचा खुलासा

या सगळ्या दरम्यान मध्येच नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या अफेअरच्या बातम्याही जोर धरुन होत्या. यावर नागा चैतन्यने नकारही दिला नाही, ना कन्फर्मेशन दिलं. पण याचवेळी आयुष्यात प्रेमाचं महत्त्व किती आहे यावर मात्र तो नक्कीच बोलला.

हेही वाचा: 'रसिकच्या निधनानंतर मी 2 दिवसांतच...', केतकी दवेंनी घेतला मोठा निर्णय

नागा चैतन्यच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर, लाल सिंग चड्ढा हा त्याचा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. सिनेमात आमिर आणि करिनासोबत तो पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title: Naga Chaitanya Reaction On Finding New

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..