esakal | सेक्रेड गेम्सच्या लेखकाची वाढत्या महागाईवर कमेंट, पोस्ट चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

सेक्रेड गेम्सच्या लेखकाची वाढत्या महागाईवर कमेंट, पोस्ट चर्चेत

सेक्रेड गेम्सच्या लेखकाची वाढत्या महागाईवर कमेंट, पोस्ट चर्चेत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईनं सर्वसामान्य माणसाचं जगणं हे अवघड करुन टाकलं आहे. काही केल्या महागाई थांबण्याचे नाव घेत नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताहेत. त्याचा परिणाम वाहतूकीवर झाला आहे. त्यावर आता सेक्रेड गेम्सच्या लेखकानं देखील कमेंट केली आहे. ज्याची सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी महागाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वरुण ग्रोव्हर यांनी केवळ सेक्रेड गेम्सचं लेखन केलं आहे असं नाही तर त्यांनी उडता पंजाब, सोनचिडिया नावाच्या चित्रपटांचे देखील लेखन केलं आहे. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरींगची पदवी घेतली आहे. त्यांची पेपर चोर नावाचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे.

कोरोनानंतर आता महागाईनं लोकांची परिक्षा पाहण्यास सुरुवात केली आहे. घरगुती गॅस हा महाग झाला आहे. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातत्यानं वाढणाऱ्या महागाईला कोण जबाबदार असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यावर केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सांगितलं आहे. यासगळ्या परिस्थितीवर सेक्रेड गेम्स या लोकप्रिय मालिकेच्या लेखकांनी टीका केली आहे. वरुण ग्रोव्हर हे सेक्रेड गेम्सचे लेखक आहेत. भारतातील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून सेक्रेड गेम्सचे नाव घेतले जाते. या मालिकेनं लहानांपासून ज्येष्ठांना वेड लावलं होतं.

वरुण ग्रोव्हर यांनी सध्याच्या परिस्थितीवर सडकून टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेयर केली आहे. ते म्हणाले आहे की, महागाई सर्वात मोठी गोष्ट आहे. सध्याच्या घडीला त्यानं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्याविषयी प्रत्येकजण व्यक्त होताना दिसतो आहे. सरकारनं त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र तसे होत नाही. सर्वसामान्य लोकांपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी एवढया महागाई काय करायचे हा प्रश्न आहे. महागाई आता थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. सप्टेंबरच्या पहिल्या दिवशीच घरगुती सिलेंडरची किंमत वाढली आहे. आता सिलेंडर २५ रुपयांनी महागला आहे. वरुण ग्रोव्हर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

loading image
go to top