बोल मैं हलगी बजाऊँ न्‌या... 

अरुण काशिद 
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

शब्द आणि सुरांची गट्टी जमली तर अवघ्या महाराष्ट्राला डोलावयास लावता येते. हे महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील दोन भावंडांनी सिध्द करुन दाखवले आहे. सिध्दहस्त गीतकार सागर बेंद्रे आणि जादुई स्वर लाभलेला साजन बेंद्रे अशी या भावंडांची नावे आहेत.

शब्द आणि सुरांची गट्टी जमली तर अवघ्या महाराष्ट्राला डोलावयास लावता येते. हे महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील दोन भावंडांनी सिध्द करुन दाखवले आहे. सिध्दहस्त गीतकार सागर बेंद्रे आणि जादुई स्वर लाभलेला साजन बेंद्रे अशी या भावंडांची नावे आहेत.

बोल मैं हलगी बजाऊँ न्‌या..., मला आमदार झाल्यासारखं वाटतयं.. या गीतावर महाराष्ट्रातील युवकांचे पाय सध्या थिरकत आहेत. ही दोन्ही गीते या दोन्ही भावंडांचीच आहेत. बोल मैं हलगी बजाऊँ न्‌या...गणेशोत्सवात वाजलेल्या या गाण्याने अवघ्या सहा महिन्यात 1 कोटी 16 लाख व्ह्युज मिळविले आहेत. तर दोन महिन्यापूर्वी आलेल्या मला आमदार झाल्यासारखं वाटतयं या गाण्याने 26 लाख व्ह्युज मिळवत सोशल मिडियावर आपली जादू कायम ठेवली आहे. 9÷नस या संगीत चॅनेलवर दिवसातून 40 ते 45 वेळा बेंद्रे बंधूंचे गाणे वाजत आहे. असे असले तरी दोन्ही भावंडांची पावले जमिनीवर आहेत.... 

निसर्गत:च लोकगीते लिहिण्याची आवड सागर बेंद्रेला लाभले आहे. तर अफलातून आवाज साजन बेंद्रे याच्याकडे आहे. ही दोन्ही भावंड आज महाराष्ट्राची कलेच्या माध्यमातून सेवा करीत आहेत. कामानिमित्त सोलापूर जिल्ह्यातून हे कुटूंब इचलकरंजीत आले. सागर आणि साजन बेंद्रेचे वडील यंत्रमागावर काम करुन संसाराचा गाडा चालवू लागले. दोन्ही मुलांनीही आपल्या कुटूंबाला हात लावत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. परंतु गायनाची आवड असलेल्या या दोघांनीही आपली कला जोपासली. सागर गाण्यांच्या चाली रचायचा आणि साजन त्या चालीवर गाणी म्हणायचा. असा यांचा रोजचा दिनक्रम. शाळेचा बॅण्ड, भजनाचा आवाज, जागर-गोंधळ अशा सगळ्या ठिकाणी त्यांची उपस्थिती ठरलेली असायची.

एका कॅसेटवर त्यांना चंदन कांबळे यांची गीते ऐकावयास मिळाली व त्याच वेळी त्यांनी कधी न भेटलेल्या व न पाहिलेल्या व्यक्तीला आपला गुरु मानला. गुरुला भेटण्याची प्रखर इच्छेने त्यांना पुण्याला जावयास भाग पाडले. पुण्यामध्ये एका हॉटेलात कफ विसळत त्यांनी गुरुचा शोध सुरुच ठेवला. त्यानंतर त्यांना आपल्या गुरुचा पत्ता मिळाला आणि त्यांनी गुरुचे घर गाठले. चंदन कांबळे या गुरुंनी त्यांना हृदयाशी कवटाळले आणि त्यांना लखाबाई आली वाड्याला या तुळजापूरातील पहिल्या गाण्यामध्ये संधी दिली. दोघांनीही मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचा गायिकेचा प्रवास सुरु झाला. यानिमित्ताने या दोन्ही बंधूंना आणखी एक संगीतकार गुरु साथीला मिळाला. या तिघांनी मिळून भिमाचं गाणं डीजेला वाजतयं... या भीमगीताची निर्मीती केली. या गीताने त्यांना यशोशिखरावर नेले. त्यानंतर शालू नाच नाच, नाचायला लागली शालू, वाजतयं ढंगळांगऽ टकळांगऽ अशी अनेक गाणी त्यांनी लिहिली व गायिली. 

बोल मैं हलगी बजाऊँ न्‌या... या गाण्याने गणेशोत्सवात युवकांना डोलावयास लावले. पाहता पाहता अवघ्या सहा महिन्यात सोशल मिडियामध्ये या गाण्याने धुमाकूळ घातला. 1 कोटी 16 लाख व्ह्युज मिळविली. विविध चॅनेलनी हे गाणे वाजवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे 9÷नस या संगीत चॅनेलवर हे गाणं दिवसातून तब्बल 40 ते 45 वेळा आज वाजत आहे. हे या गाण्याचे विशेषच म्हणावे लागेल. मराठी गाण्यांचे अनेक रेकॉर्डस्‌ या गाण्याने केंव्हाच मागे टाकली आहेत. जवा बघतिस तु माझ्याकडं.... मला आमदार झाल्यासारखं वाटतयं, हे गाणं सध्या महाराष्ट्रात वाजत आहे. अवघ्या दोन महिन्यात 26 लाख प्रेक्षकांनी यु-ट्युबच्या माध्यमातून याला पसंती दिली आहे. अनेक नवीन गाणी आता सागर व साजन बेंद्रे यांची येत आहेत. गाण्याची लोकप्रियता पाहून दिग्दर्शक निलेश आहेर यांचा दडपण चित्रपट येत आहे. या चित्रपटात सागरचे गाणे असणार आहे. नगर जिल्ह्यातील खरडा या गावामध्ये झगमगाय लागलयं.... या गाण्याचे चित्रीकरण झाले आहे. यशोशिखर गाठत असतानाही सागर आणि साजन या दोघांचं नातं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याशी व इचलकरंजीशी घट्ट आहे. त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत. 

अनेक नवीन गाणी आपल्या भेटीला - सागर बेंद्रे 
साजन व विशाल संगीत देत असलेली अनेक गाणी लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहेत. आमदार झाल्यासारखं वाटतयं त्याचबरोबर देखा हे पहली बार, ही गाणी सध्या महाराष्ट्रात वाजत आहेत. याहून सरस गाणी आम्ही रसिक श्रोत्यांना लवकरच देणार आहोत. युवकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. अशीच सेवा करण्याची संधी महाराष्ट्रातील रसिक कलाकारांनी आम्हाला द्यावी, असे गीतकार सागर बेंद्रे यांनी सांगितले. 
 

Web Title: Sagar and Sajan Bendre special story