सही पकडे है.. 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

शिल्पा शिंदेच्या अंगुरी भाबीने "भाभीजी घरपे है'मधून एक्‍झिट घेऊन बराच काळ लोटला; पण तिच्या जाण्याचं कवित्व अद्याप सुरूच आहे. ती म्हणतेय, शो मधून बाहेर पडल्यानंतर तिला इतर कोणत्याही वाहिनीवर काम मिळू नये, म्हणून तिच्या या शोच्या निर्मात्यांनी, बेनफर आणि संजय कोहलींनी प्रयत्न केले. धमक्‍या दिल्या. मोठी नुकसानभरपाईही मागितलीय. 

पण शिल्पानेही निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केलीय. लैंगिक शोषणाची. त्यावरून बरीच भवतीनभवती झाली. शिल्पाने हा आरोप हेतुपुरस्सर आणि स्वतःला वाचवण्यासाठीच केला असंच म्हटलं गेलं. 

कविता कौशिक या अभिनेत्रीनेही म्हटलं की, शूटिंगदरम्यान असं काही होत होतं तर शिल्पा इतका वेळ गप्प का बसली? तिने त्याच वेळी बोलायला हवं होतं... 
शिल्पाने तिला उत्तर दिलंय. ती म्हणते, "मी त्या वेळी बोलले नाही ही माझी चूकच आहे. पण आपल्या शोच्या निर्मात्याविरोधात बोलणं किती कठीण आहे, हे कोणत्याही कलाकाराला विचारून पाहा. त्यातून अभिनेत्रीने असा काही आरोप केला तर दोषी तिलाच मानलं जातं. मी कसं बोलणार होते तेव्हा...' 

शिल्पाचं म्हणणं बरोबर आहे की चूक ही वेगळी गोष्ट; पण तिची सगळ्या बाजूंनी कोंडी केली जाताना दिसतेय ही गोष्ट खरीच. पण काही कलाकार तिला पाठिंबा द्यायला पुढे येताना दिसताहेत. अभिनेत्री समिक्षाने बिनायफर आणि संजय कोहली यांच्यासोबत काम केलं होतं. ती म्हणते, "हे दोघं कलाकारांना कामगारांपेक्षाही वाईट वर्तणूक देत. कलाकारांना अगदी वाईट वाईट शिव्याही घातल्या जात. त्यामुळे...' 

शिल्पाने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही; पण अंगुरी भाभी यावर नक्की बोलली असती..."सही पकडे है...!!!' 

Web Title: Sahi Pakde Hai! 'Bhabhi Ji Ghar Par Hain'