'सहकुटुंब सहपरिवार'मधील अभिनेत्रीची निर्मात्यांविरोधात तक्रार | Sahkutumb Sahaparivar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sahkutumb Sahaparivar

'सहकुटुंब सहपरिवार'मधील अभिनेत्रीची निर्मात्यांविरोधात तक्रार

स्टार प्रवाह वाहिनीवरील ' सहकुटुंब सहपरिवार ' Sahkutumb Sahaparivar या मालिकेत सूर्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिकेचे निर्माते आणि सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी या संदर्भात युट्यूबवर व्हिडिओ शेअर केला आहे. अन्नपूर्णा यांनी निर्मात्यांविरोधात मानसिक त्रास दिल्याची तक्रार दाखल केली आहे. याविषयी मालिकेच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

अन्नपूर्णा यांनी २२ नोव्हेंबर रोजी दादर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. मालिकेच्या सेटवर त्यांना इतका त्रास देण्यात आला की त्यामुळे त्या नैराश्यात गेल्याचा आरोप अन्नपूर्णा यांनी केला आहे. मालिकेचे दिग्दर्शक भरत गायकवाड सतत म्हातारी म्हणून हिणवत असत आणि सेटवर अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप अन्नपूर्णा यांनी केला आहे. अन्नपूर्णा या दक्षिण भारतीय असून त्यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलंय. सहकुटुंब सहपरिवार ही त्यांची पहिलीच मराठी मालिका आहे. मालिकेतील सहकलाकार नंदिता पाटकर यांच्यावरही त्यांनी आरोप केले आहेत.

हेही वाचा: 'उघडपणे माझी खिल्ली उडवली'; अपूर्वाने सांगितलं 'शेवंता' सोडण्यामागचं कारण

सेटवर होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून ऑगस्टमध्ये मालिका सोडल्याचं त्यांनी सांगितलं. भरत गायकवाड यांनी मानसिक छळ केला, शिवीगाळ केली, असं त्या म्हणाल्या.

loading image
go to top