सई ताम्हणकरला नेटकरी का म्हणतायत, 'ओ स्त्री कल आना'

स्वाती वेमूल
Friday, 19 February 2021

सईने पोस्ट केलेला हा फोटो एकदा पाहाच!

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस व तितकीच बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर सई तिचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. सईने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून सध्या नेटकऱ्यांमध्ये याच फोटोची चर्चा रंगली आहे. सईचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला 'ओ स्त्री कल आना' असंच म्हटलंय. 

शूटिंगदरम्यान सेटवरचा हा फोटो सईने पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सई साडी नेसून तिचं तोंड पदराने पूर्ण झाकलंय आणि त्यावर तिने शॉल पांघरून घेतलंय. फोटोत सईचा चेहरा अजिबात दिसत नाहीये आणि ती कुठल्या तरी शेतात उभी आहे. तिचा हा विचित्र फोटो पाहून नेटकरी तिला 'ओ स्त्री कल आना' म्हणतायत. राजकुमार राव व श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री' या चित्रपटातील हा गाजलेला डायलॉग आहे. या चित्रपटात गावकरी भूताला घाबरून तिला म्हणतात, 'ओ स्त्री कल आना'. सईच्या या फोटोला अठरा हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. 

हेही वाचा : "आम्ही दोघं"; बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत जोडलं जातंय अभिनेत्रीचं नाव

हेही वाचा : कोणत्याही क्षणी करीना देऊ शकते 'गुड न्यूज'; भेटवस्तूंचा वर्षाव 
 

सईने तिच्या करिअरची सुरुवात मालिकांपासून केली. 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'अनुबंध', 'अग्निशिखा', 'साथी रे', 'तुझं माझं जमेना' या मालिकांमध्ये काम केलं. सईचा 'सनई चौघडे' हा चित्रपट चांगलाच गाजला. 'दुनियादारी', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' यांसारख्या चित्रपटांमधून तिने अभिनयाची छाप सोडली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sai tamhankar posts a picture of her and netizens commented her o stree kal aana