100 K चा टप्पा गाठणार कोण? सई की अमृता?

रविवार, 8 ऑक्टोबर 2017

फाॅलोअर्सची संख्या सतत वाढती ठेवण्यासाठी सोशल मीडीयावर सतत बोलत राहणं ही गरजेचं असतं. आता या सगळ्या प्रकारात 100चा आकडा सर्वात आधी सई पार करते की अमृता हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल. की या शर्यतीत आणखी कोणी डार्क हाॅर्स बनून पुढे जाईल हे सांगता येत नाही. पण कलाकारांच्या या फाॅलोअर्सकडे त्या त्या कलाकाराच्या चाहत्यांचं व्यवस्थित लक्ष असतं. 

पुणे : एकदा एखादी व्यक्ती सोशल मीडीयावर आली की तिचं आपल्या फाॅलोअर्सकडे लक्ष असतं. आपले फाॅलोअर्स वाढावेत म्हणून सगळी मंडळी कसोशीने प्रयत्न करत असतात. सेलिब्रेटीही याला अपवाद नाही. कलाकाराची लोकप्रियता जेवढी जास्त तेवढे त्याचे फाॅलोअर्स जास्त असतात. आता अमिताभ बच्चन यांचं उदाहरण घ्या. त्यांनी नुकतेच 30 मिलीयनचा टप्पा पार केला. बडुंम्बा म्हणत त्यांनी ही बातमी ट्विट केली. त्याच धर्तीवर आपले मराठी कलाकारही कमी नाही. शिवाय तरूणाई आता ट्विटरवर येऊ लागली आहे. त्यामुळे कलाकारांच्या फाॅलोअर्समध्ये वाढ होताना दिसते. अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, स्पृहा जोशी ही त्यातली काही मुख्य नावं म्हणता येतील. ही अशी नावं आहेत जी फक्त मराठी चित्रपटांमध्ये कामं करतायत. अपवाद म्हणून इतर भाषेतले सिनेमे ही मंडळी स्वीकारतात. सध्या सई आणि अमृताच्या फाॅलोअर्सवर नेटकऱ्यांच लक्ष आहे. या दोघींपैकी 100 के चा टप्पा कोण गाठणार याकडे सर्वांची उत्सुकता लागून राहीली आहे. 

सध्या टि्वटरवर असलेल्या फाॅलोअर्समध्ये अमृता खानविलकरचे फाॅलोअर्स आहेत 96.5 के तर सई ताम्हणकरचे आहेत 95.2 के. यापूर्वी सईचे फाॅलोअर्स जास्त होते. पण गेल्या काही दिवसांत आपल्या नेटवर्किंगमुळे अमृताने आघाडी घेतली आहे. या दोघींच्या मागे स्पृहा जोशी आहे. तिचे ट्विटरवरचे फाॅलोअर्स आहेत 93.4 के. त्यानंतर सोनाली कुलकर्णी 80.1 आणि स्वप्नील जोशी 72.8 के असा क्रमांक लागतो. पुरूष कलाकारांमध्ये क्रमांक एकवर स्वप्नील विराजमान आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तोही सोशल साईटवरून गायब आहे. इकडे सई ताम्हणकरही फार काही ट्विट करताना किंवा इंटरअॅक्शन करताना दिसत नाही. त्याचवेळी अमृताने मात्र सोशल साईटवर जोरदार आघाडी उघडल्याचं चित्रं दिसतं. 

फाॅलोअर्सची संख्या सतत वाढती ठेवण्यासाठी सोशल मीडीयावर सतत बोलत राहणं ही गरजेचं असतं. आता या सगळ्या प्रकारात 100चा आकडा सर्वात आधी सई पार करते की अमृता हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल. की या शर्यतीत आणखी कोणी डार्क हाॅर्स बनून पुढे जाईल हे सांगता येत नाही. पण कलाकारांच्या या फाॅलोअर्सकडे त्या त्या कलाकाराच्या चाहत्यांचं व्यवस्थित लक्ष असतं. 

 

 

Web Title: saie tamhankar amrita khanvilkar twitter followers esakal news