esakal | 'लायगर Vs भूत पोलिस'' काट्याची टक्कर; बॅाक्स ऑफिसवर मोठी फाईट
sakal

बोलून बातमी शोधा

'लायगर Vs भूत पोलिस'' काट्याची टक्कर; बॅाक्स ऑफिसवर मोठी फाईट

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या हॉरर चित्रपटांची रेलचेल पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर, वरूण शर्मा आणि राजकूमार राव यांचा रूही हा हॉरर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

'लायगर Vs भूत पोलिस'' काट्याची टक्कर; बॅाक्स ऑफिसवर मोठी फाईट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या हॉरर चित्रपटांची रेलचेल पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर, वरूण शर्मा आणि राजकूमार राव यांचा रूही हा हॉरर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर जान्हवी कपूरने 'भेडीया' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला होता. 'भेडीया' चित्रपटात वरूण धवन, क्रिती सेनन हे प्रसिध्द कलाकार दिसणार आहे.

हॉरर चित्रपटाच्या यादीत आता 'भूत पोलिस' चित्रपटाचे नाव जोडले जाणार आहे. या चित्रपटाला पूरी जग्गनाथ दिग्दर्शित 'लायगर' चित्रपट काट्याची टक्कर देईल अशी चर्चा सुरू आहे. 

नुकताच  भूत पोलिस' या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. सैफ अली खान, अर्जून कपूर, जॅाकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे कथानक हॉरर कॅामेडीवर आधारित आहे. चित्रपटाचे चित्रीकरण हिमाचल प्रदेशमध्ये झाले आहे. 10  सप्टेंबर 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  पवन किर्पालानी यांनी या चित्रपटातचे दिग्दर्शन केले आहे. रमेश, तौराणी आणि अक्षय पूरी यांना चित्रपटाची निर्मिती केली आहे. नोव्हेंबरमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. 5 फेब्रुवारीला चित्रीकरणं संपले. 

भूत पोलिसच्या रिलीज डेट आधी म्हणजेच 9 सप्टेंबरला विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा 'लायगर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे भूत पोलिस आणि लिगरची बॅाक्स ऑफिस फाईट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Edited By - Prashant Patil