Saif Ali Khan : सैफ अली खानने 'हाउस ऑफ पतौडी'बाबत केला खुलासा; म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saif Ali Khan Latest News

Saif Ali Khan : सैफ अली खानने 'हाउस ऑफ पतौडी'बाबत केला खुलासा; म्हणाला...

Saif Ali Khan Latest News कपिल शर्मा (Kapil Sharma) शो घेऊन परतलाच नाही तर हास्याचा डबल डोस घेऊन आला आहे. कपिलच्या शोमध्ये काही स्टार सहभागी झाले आहेत. यावेळी कपिल शर्माच्या शोमध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि राधिका आपटे आले. कपिलने चाहत्यांना सांगितले की, सैफ अली खानने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड उघडला आहे. याचं नाव हाउस ऑफ पतौडी आहे. जो आजकाल प्रसिद्ध ब्रँड म्हणून उदयास आला आहे.

सैफच्या नवीन ब्रँडबद्दल विचारले असता कपिल शर्मा (Kapil Sharma) म्हणतो की, सैफला तेच कपडे मिळतात जे पतौडी परिधान करतात. यावर सैफ (Saif Ali Khan) म्हणतो, नाही... येथे सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. जे कपडे विकले जात नाहीत ते मी घालतो. सैफच्या या गोष्टीने चाहत्यांचे मन आनंदी झाले. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्सची लांबलचक रांग लागली आहे.

हेही वाचा: Mouni Roy : मौनी रॉयला पाहून आठवेल उर्फी; पाहा फोटो

सैफ अली खानचा विक्रम वेधा हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटात सैफसोबत हृतिक रोशन दिसणार आहेत. चित्रपटात सैफ पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर हृतिक रोशन वेधाच्या भूमिकेत आहे. दोघांचा हा चित्रपट साउथच्या विक्रम वेधा या चित्रपटाचा रिमेक आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.