esakal | तैमुर, जहांगिरच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना सैफचं सडेतोड उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

तैमुर, जहांगिरच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना सैफचं सडेतोड उत्तर

तैमुर, जहांगिरच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना सैफचं सडेतोड उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सैफ अली खान Saif Ali Khan आणि अभिनेत्री करीना कपूर Kareena Kapoor यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगिर Jehangir ठेवलं. पहिल्या मुलाचं नाव तैमुर Taimur आणि दुसऱ्याचं नाव जहांगिर ठेवण्यावरून नेटकऱ्यांनी या दोघांना खूप ट्रोल केलं. 'करीना आणि सैफच्या मुलांची नाव- तैमुर, जहांगीर आणि तिसरा असेल औरंगजेब', असं काहींनी म्हटलं. तर 'सैफ- करीना 21 व्या शतकातील मुघल राजवंश चालवत आहेत. सैफ स्वत:ला बाबर समजत आहे,' अशा शब्दांतही काहींनी टीका केली. या सर्व नकारात्मक प्रतिक्रियांवर आता पहिल्यांदाच सैफने मौन सोडलं आहे.

काय म्हणाला सैफ?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्रोलिंगबाबत सैफ म्हणाला, "या जगात सर्व गोष्टी समान नाहीत. लोक तितकेच आनंदी नाहीत. आम्ही विशेषाधिकार असलेली लोकं आहोत आणि मला वाटतं की आम्ही चांगले लोक आहोत. आम्ही आमचा कर भरतो, कायद्याने वागतो आणि लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही मेहनत करतो. या जगात सकारात्मकता पसरवण्यासाठी आम्ही आमचं योगदान देतो. जे लोक नकारात्मकता पसरविण्यात योगदान देत आहेत आणि भेदभाव करून भयंकर पद्धतीने वागत आहेत, अशा लोकांवर टिप्पणी करणं खरोखर फायदेशीर नाही. अशा कमेंट्स वाचण्यापासून मी स्वत:ला लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसर्‍या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो."

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील बबिता-टप्पू एकमेकांना करतायत डेट

सैफ आणि करीनाने २०१२ मध्ये लग्न केलं. 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. २० डिसेंबर २०१६ रोजी तैमुरचा जन्म झाला. तर करीनाने २१ फेब्रुवारी २०२१ रोजी जहांगिरला जन्म दिला.

loading image
go to top