esakal | "माझ्याजवळ आता दहा डोकी", 'आदिपुरुष'साठी सैफ एक्सायटेड!
sakal

बोलून बातमी शोधा

adipurush movie

"माझ्याजवळ आता दहा डोकी", 'आदिपुरुष'साठी सैफ एक्सायटेड!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता सैफ अली खान (saif ali khan ) हा त्याच्या आगामी आदिपुरुष (adipurush ) चित्रपटावरुन चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु होती. गेल्या महिन्यात त्याच्या या चित्रपटाच्या सेटला आगही लागली होती. त्यातील पात्र आणि कथेवरुन मोठा वादही रंगला होता. अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्यानं काही राजकीय पक्षांनी त्या वादात उडीही घेतली होती. आता सैफ पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये आला आहे. त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की, आपण या चित्रपटामध्ये केलेली भूमिका प्रभावी झाली आहे. (saif ali khan role in adipurush saif ali says i do have ten heads at a point )

त्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे सैफनं (saif ali khan ) आपल्याला दहा डोकी असणा-या रावणाची (Ravan) भूमिका करायला मिळाली आहे. याविषयी वक्तव्य केलं आहे. आदिपुरुषमध्ये सैफनं रावण साकारला आहे. त्याच्या या भूमिकेवरुन काही दिवसांपूर्वी वादही रंगला होता. त्या वादाला सैफनं संयमानं घेतलं होतं. अनेकांनी त्या भूमिकेचे राजकीय भांडवल करुन त्याला त्रास देण्याचाही प्रयत्न केला होता. यावेळी सैफनं सर्वांना शांततेन उत्तर दिलं.

हेही वाचा: Shruti Haasan : 'बरं झालं आईबाबांनी घटस्फोट घेतला'

हेही वाचा: 'राणादा'ने का घेतली आशुतोष गोवारीकरांची भेट?

आदिपुरुष हा चित्रपट भूषण कुमार यांच्या टी सीरिज कंपनीनं निर्मित केला आहे. त्याचे दिग्दर्शन ओम राऊत करत आहे. भारतीय महाकाव्य रामायणवर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटाची टॅगलाईन वाईटपणावर चांगुलपणाची मात आणि त्याचा विजयोत्सव अशी आहे.