सैफ करणार "कालाकांडी' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

अभिनेता सैफ अली खानचे चित्रपट सध्या तिकीटबारीवर आपटताहेत. त्याचा शेवटचा चित्रपट "रंगून' फारसा चालला नाही. आता तो "कालाकांडी' चित्रपटात झळकणार आहे.

सैफच्या मते तो फार मजेशीर चित्रपट आहे. त्याचं दिग्दर्शन अक्षत वर्माने केलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाची पटकथा सैफला ध्यानात ठेवून लिहिण्यात आली आहे. त्यामुळे ती लिहायला तब्बल दोन वर्षं लागली. चित्रपटाबाबत सैफ म्हणतो, " "कालाकांडी' चित्रपटाचा एक भाग बनल्यामुळे मी खूप खूश आहे. चित्रपटात मुंबईची पार्श्‍वभूमी आहे. प्रेम आणि अपराधावर तो आधारित आहे.

अक्षतने चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबर त्याची पटकथाही लिहिली आहे. त्याने चित्रपट अप्रतिम बनवलाय. मुंबईचे रंग त्याने उत्तम टिपलेत.' "कालाकांडी'मध्ये दीपक डेब्रियाल, विजय राज, कुणाल रॉय कपूर, सोबिता धुलिपला, अक्षय ओबरॉय, ईशा तलवार, शहनाज टेजारीवाला, शिवम पाटील, अमायरा दस्तूर, नील भूपलम आदी प्रतिभावान कलाकारांची टीम मुख्य भूमिकेत आहे. 

Web Title: Saif ali khan will do "Kala Kandi"