Jawani Janeman : सैफ करणार फ्लर्ट आणि तब्बूचा हटके अंदाज, ट्रेलर पाहाच !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

तान्हाजीला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच सैफच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'जवानी जानेमन' असं त्या चित्रपटाचं नाव असून नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

मुंबई : नवीन वर्षात एकापेक्षा एक चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे. बॉलिवूडचा नवाब म्हणजेच सैफ अली खान नेहमीच अनोखी भूमिका साकारताना दिसतो. मागिल वर्षी 2019 मध्ये सैफ 'लाल कप्तान' या चित्रपटातून झळकला. तर, वर्षाच्य़ा सुरुवातीलाच तो 'तान्हाजी' या चित्रपटातून दिसला आहे. तान्हाजीला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच सैफच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'जवानी जानेमन' असं त्या चित्रपटाचं नाव असून नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

Happy Birthday Hritik : घटस्फोटानंतरही सुझानचं हृतिकवर तितकंच प्रेम; केलं स्पेशल विश!

सैफच्या 'जवानी जानेमन' या चित्रपटाचा पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रिलिज झाला आणि सर्वत्र त्याचीच चर्चा पाहायला मिळाली. चर्चा होण्याचं कारण म्हणजे पोस्टरमध्ये सैफ वेगळ्याच लुकमध्ये दिसला. दारू पिऊन बेडवर पडलेला सैफ आणि त्याच्या बाजूला असणारी मुलगी. एकुणच पोस्टरवरुन असे लक्षात येते की, सैफ हा फ्लर्ट करणाऱ्या भूमिकेत आहे. पोस्टर पाहिल्यावर सैफचा नवा लुक बघून चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये वाढली होती. ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते की सैफ हा बिंन्धास्त आणि केअरफ्री असा मुलगा आहे. ज्याला पार्टी करायला, फिरायला, मुलींसोबत राहायला आणि  त्यांच्यासोबत फ्लर्ट करायला आवडते. 

मी पण काही व्हर्जिन नाही: नेहा पेंडसे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Trailer out now! Be there, 31/01/2020! #JawaaniJaaneman #AlayaF #saifalikhan #tabu

A post shared by Alaya F (@aalia.ebrahim) on

सैफ म्हणजेच चित्रपटातील अमर खन्ना परिवाराच्या जबाबदारींपासून पळ काढतो कारण त्याला ते सर्व नको आहे. अमरचं जीवन हे केवळ मस्ती आणि मौजेने भरलेली आहे. पण, त्याच्या या मस्तीच्या माहोलमध्ये अचानक एक ट्विस्ट येतो. एक मुलगी अचानक त्याच्याकडे येते. पण, ही मुलगी त्याची प्रेयसी नसून ती त्याचीच मुलगी असल्याचं समजतं. त्यानंतर संपूर्ण कहानी बदलते. 

सैफच्या मुलगीच्या भूमिकेत आलिया इब्राहिम ही अभिनेत्री दिसणार आहे. आलियाच्या उत्तम अभिनयाची झलक यामध्ये दिसली. तर, आलियाच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री तब्बू दिसतेय. तब्बूचा यामधील अंदाज खूप हटके आहे. चित्रपटात तब्बूला हे माहित नसतं की आलियाच तिची मुलगी आहे. एकुणच चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक ट्विस्ट आणि गोलमाल आहे. ही मजेशीर, कॉमेडी आणि इमोशनल कथा पाहण्यास प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल. 

आलिया या चित्रपटासह बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. फक्त 22 वर्षांची ही अभिनेत्री पहिल्याच चित्रपटातून आत्मविश्वासू दिसते आणि तब्बू व सैफ सारख्या बड्या कलाकारांसोबत तिला ब्रेक मिळाला आहे. 'जवानी जानेमन' हा चित्रपट 31 जानेवारीला रिलिज होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saif ali khans upcoming movie Jawani Janeman trailer out