'माझी डुप्लिकेट पाहा' म्हणत सायनाने शेअर केला बायोपिकमधील परिणीतीचा फर्स्ट लूक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 5 November 2020

नुकतंच सायना नेहवालने सिनेमात परिणीती कशी दिसेल? याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमध्ये परिणीती हुबेहुब सायनासारखी दिसत आहे.

मुंबई- बॉलीवड असो, हॉलीवूड असो किंवा मग मराठी सिनेमा. सध्या मनोरंजन विश्वात बायोपिकचे वारे वाहत आहेत. बॉलीवूडमध्ये  ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सरदार उधम सिंग’ असे  आगामी अनेक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याच यादीत आता आणखी एका नव्या सिनेमाची भर पडली आहे. हा सिनेमा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारत असून ती भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत करताना दिसतेय.

हे ही वाचा: आदित्य नारायण त्याच्या लग्नात वडिलांच्या हिट गाण्यांवर करणार डान्स, असं आहे पूर्ण प्लानिंग..    

नुकतंच सायना नेहवालने सिनेमात परिणीती कशी दिसेल? याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमध्ये परिणीती हुबेहुब सायनासारखी दिसत आहे. 'माझी डुप्लिकेट पाहा' असं म्हणत सायनाने ट्विट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. सायना नेहवालचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सायनावरिल हा सिनेमा खरं तर गेल्या वर्षापासून चर्चेत आहे. या सिनेमात सुरुवातीला श्रद्धा कपूर झळकणार होती. तिने बॅटमिंटनच्या सरावास सुरुवात देखील केली होती. पण ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या दोन सिनेमांमध्ये बिझी असल्याने श्रद्धाने अखेर सायनाच्या बायोपिकवर पाणी सोडलं असं म्हटलं जातं. त्यानंतर परिणीतीची या सिनेमासाठी निवड करण्यात आली. सध्या मनोरंजनविश्वात बायोपिकचा ट्रेण्ड सुरु असल्याने प्रेक्षकांमध्ये या आगामी बायोपिकची उत्सुकता आहे. 

saina nehwal calls parineeti chopra her lookalike on seeing first look from her biopic  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saina nehwal calls parineeti chopra her lookalike on seeing first look from her biopic