rinku
rinku

आर्चीला लागलंय फिटनेसचं याड; फोटो पाहून चाहते 'सैराट'

'सैराट' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपासून रिंकू तिच्या फिटनेसवर बरंच लक्ष देत असून तिने वजनसुद्धा कमी केलं आहे. मध्यंतरी तिने वर्कआऊटचेही फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आता रिंकूने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. या फोटोमध्ये रिंकूने क्रॉप टॉप परिधान केला आहे. रिंकूचा हा अंदाज नेटकऱ्यांना आवडला असून तिच्या फिटनेसबाबत काहींनी प्रश्नसुद्धा विचारले आहेत. 

रिंकू एका चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त लंडनला गेली होती. लॉकडाउनमुळे ती काही दिवस तिथेच अडकली होती. भारतात परतल्यानंतर तिने फिटनेसवर पूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. सोशल मीडियावरील फोटोंमध्ये रिंकूचा नवीन अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतोय. कधी साडी, कधी पंजाबी सूट तर कधी वेस्टर्न ड्रेस, अशा नानाविध लूक्समध्ये ती फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांकडूनही या फोटोंना चांगला प्रतिसाद मिळतो. 

'सैराट'नंतर रिंकूने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयाच्या नवा पैलू प्रेक्षकांना विविध माध्यमांमधून पाहायला मिळतोय. आता ती लवकरच 'झुंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन 'सैराट'चे नागराज मंजुळे करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 
मनोरंजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com