प्रिन्स आणि सल्या पुन्हा एकत्रित! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

आता 'सैराट' या चित्रपटातील विरोधी जोडी प्रिन्स आणि सल्या लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे.

संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या 'सैराट' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आर्ची आणि परश्‍या या जोडीसोबतच अन्य कलाकार सल्या, प्रिन्स, बाल्या, आनी या सर्वाच्या भूमिकादेखील भाव खाऊन गेल्या आहेत. मात्र प्रिन्स आणि सल्याची या चित्रपटात विरोधी भूमिका असली तर त्यांच्या या भूमिकेने प्रेक्षकांमध्ये छाप पाडली आहे. आता सैराट या चित्रपटातील विरोधी जोडी लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. सूरज पवार (प्रिन्स) आणि अरबाज शेख (सल्या) ही जोडी आता 'सैराट'नंतर पुन्हा एकाच मराठी चित्रपटात झळकणार आहे. मात्र त्यांची ही भूमिका आता दोस्तीत का पुन्हा दुश्‍मनीत असणार आहे हे अदयापदेखील कळाले नाही. पण ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास तयार झाली आहे हे नक्की. तसेच या चित्रपटात त्यांच्यासोबत अनेक मराठी कलाकारदेखील पाहायला मिळणार आहे. मात्र या चित्रपटासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sairat fame Prince and Salya are work together again