Video : 'सैराट'फेम आर्चीचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावरती घालतोय धुमाकूळ

Video : 'सैराट'फेम आर्चीचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावरती घालतोय धुमाकूळ

पुणे : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटातून रिंकू राजगुरू हा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला. बरं नुसता प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही, तर आर्चीच्या रुपातील या चेहऱ्याचा प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. त्यांना अक्षरश: 'याड लावलं'. 'सैराट'मुळे प्रकाशझोतात आलेल्या रिंकूने पाहता पाहता तिचा वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला. पुढे ती 'कागर' या चित्रपटातूनही झळकली. सध्या ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने आपल्या फेसबुक पेजवरती एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ सोशल मिडीयावरती अक्षरश: धूमाकुळ घालत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Black and white

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

सैराटमधील गाजलेल्या भूमिकेमुळे रिंकूकडे अनेक प्रोजेक्टची रांग लागली आहे. जाहिरात विश्वालाही तिने याडं लावले आहे. अनेक जाहिरातींचे प्रोजेक्टही तिच्याकडे आले आहेत. त्यामुळे सध्या ती या प्रोजेक्टची तयारी करत आहे. तिची मध्यंतरी लारा दत्तासोबत 'हड्रेड' ही वेब सिरीज देखील झळकली. यामध्ये देखील तिच्या चांगल्या अभिनयाची झलक तिच्या चाहत्यांना पाहावयास मिळाली. या तिच्या भूमिकेच्या तिच्या चाहत्यांनी कौतुक केले.    

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Promotion time #MakeUp#

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावरती धूमाकुळ घालत आहे. हा व्हिडिओ तिच्या फेसबुक पेजवरती तिने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका तेलगू चित्रपटाच्या गाण्यावरती आपली झलक देत आहे. हा व्हिडिओ तिने घराच्या गच्चीवरती शुट केला आहे. तिचे चाहते या व्हिडिओचे कौतुक करत आहेत. रिंकू ज्या गाण्यावरती थिरकत आहे, ते गिता गोविंदम् या तेलगू चित्रपटातील आहे. या गाण्यातील तिची झलक प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

मध्यंतरी तिने आपल्या सोशल मिडियावरती टाकलेल्या साडीच्या फोटोने देखील चाहत्यांची वाहवा मिळवली होती. गीता गोविंदम या चित्रपटातील गाण्याचा तिने टाकलेला व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर लाईक व शेअर केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com