नाशिकची संयमी झळकणार रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016

नाशिक - नाशिकमधील आणखी एक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर यायला सज्ज आहे. यंदाच्या बहुचर्चित ब्लॉकबस्टर "मिर्झिया‘ चित्रपटातून प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा पुत्र हर्षवर्धनसह नाशिककर संयमी खेर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. 

नाशिक - नाशिकमधील आणखी एक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर यायला सज्ज आहे. यंदाच्या बहुचर्चित ब्लॉकबस्टर "मिर्झिया‘ चित्रपटातून प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा पुत्र हर्षवर्धनसह नाशिककर संयमी खेर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. 

"मिर्झिया‘ या चित्रपटाचे टायटल सॉंग प्रदर्शित झाले असून, दोनच दिवसांत हजारोंनी हिट्‌स मिळत आहेत. "रंग दे बसंती‘ आणि "भाग मिल्खा भाग‘चे निर्माते असलेले राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा "मिर्झिया‘ हा वेगळा चित्रपट असून, या चित्रपटातून नाशिककर असलेली संयमी खेर प्रथमच बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. प्रख्यात गीतकार गुलजार यांचे चित्रपटातील टायटल सॉंगचे शब्द आहेत. चित्रपटात प्रख्यात गायक दलेर मेहंदीच्या आवाजात गाणी असणार आहेत. पंजाबी लोककथेवर आधारित या चित्रपटाची कथा-पटकथाही गुलजार यांची असून, चित्रपटाला शंकर- एहसान- लॉय जोडीचे संगीत लाभलेले आहे. 

नाशिकची संयमी ही हिंदी चित्रपटातील एकेकाळच्या प्रख्यात अभिनेत्री उषाकिरण यांची नात आहे; तर एकेकाळच्या "मिस इंडिया‘, प्रख्यात मॉडेल उत्तरा खेर आणि प्रख्यात मॉडेल अद्वैत खेर यांची कन्या आहे. नाशिकला झालेले शिक्षण व घरातच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या संयमीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर काही ऍड फिल्म्समध्ये काम केले. काही प्रख्यात ब्रॅंड्‌सच्या जाहिरातीही केल्या. लेवीस, पॅन्टलून, लॉरिअल, आयडी आयवेअरच्या जाहिरातींमधून काम केल्यावर तिला चित्रपटांच्या ऑफर आल्या. वर्षभरापासून चर्चेतील हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

Web Title: saiyami kher, entertainment, bollywood, nashik, north maharashtra

टॅग्स