esakal | वडील मोहन गोखलेंसाठी सखीची भावनिक पोस्ट

बोलून बातमी शोधा

Mohan Gokhale

वडील मोहन गोखलेंसाठी सखीची भावनिक पोस्ट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या सर्वांत जवळची व्यक्ती आपल्यापासून कितीही दूर गेली तरी त्या व्यक्तीच्या आठवणी कायम आपल्या मनात राहतात. त्या आठवणींना आपण मनाच्या एका कोपऱ्यात मौल्यवान वस्तूप्रमाणे जपून ठेवतो. वडील आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्या अशाच काही मौल्यवान आठवणी अभिनेत्री आणि त्यांची मुलगी सखी गोखलेने मनात साठवून ठेवल्या आहेत. वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त या सर्व आठवणी तिला दाटून आल्या आहेत. सखीने सोशल मीडियावर बाबांसोबतचा तिचा एक फोटो पोस्ट करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. सखीच्या बालपणीचा हा फोटो आहे. मोहन गोखलेंच्या मांडीवर बसून ती त्यांच्यासोबत खेळताना या फोटोत दिसतेय.

सखीची पोस्ट:

'गेल्या २२ वर्षांत, मी अनेक ठिकाणी फिरले, खूप चांगल्या लोकांना भेटले, तुम्ही लिहिलेली पुस्तकं वाचली, तुमचे कपडे घातले आणि त्या सर्व क्षणांमध्ये विचार केला की तुम्हालाही या सर्व गोष्टी आवडत्या असतील का? आणि मग असेही क्षण आहेत, ज्यावेळी मला तुमचा अनुभव घेता आला नाही. सर्व आठवणींची ही एक प्रकारची पोतडीच आहे. बाबा, तुमचा मी नेहमीच विचार करते. माझ्या रक्तात आणि हृदयात तुम्ही कायम आहात', अशा शब्दांत सखीने तिच्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा : 'सिंघम'कडून महापालिकेला मदत; दादरमध्ये उभारणार ऑक्सिजन बेड्सचं कोव्हिड सेंटर

वयाच्या ४५व्या वर्षी मोहन गोखले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सखी ही मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची मुलगी आहे. मोहन गोखलेंनी 'हिरो हिरालाल', 'मोहन जोशी हाजीर हो' यांसारख्या अनेक चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या आहेत.