साक्षी तन्वरच्या 'माई'ची का होतेय चर्चा? काय आहे या वेब सिरीजमध्ये? | sakshi tanwar new web series on netflix | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakshi tanwar in mai

साक्षी तन्वरच्या 'माई'ची का होतेय चर्चा? काय आहे या वेब सिरीजमध्ये?

"कहानी घर घर की', "बडे अच्छे लगते है' या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली साक्षी तन्वरने (sakshi tanwar) तिच्या अभिनयाचा वेगळाच पोत रसिकांसमोर आणला आहे. मालिका विश्वातील अभिनेत्री चित्रपटात अशी काम करेल अशी अनेकांना शंका होती पण 'दंगल' सिनेमातील तिचे काम पाहून अनेकांचे तोंड बंद झाले. त्यांनतर साक्षीने वेब सिरीजमध्ये काम करण्याचा धडाकाच लावला. करले तु भी महोब्बत, द फायनल कॉल, मिशन ओव्हर मार्स अशा अनेक वेब सिरीज तिनं गाजवल्या. आता आणखी एक दर्जेदार वेबसिरीज घेऊन साक्षी प्रेक्षकाच्या भेटीला आली आहे.

हेही वाचा: बारा दिवसांचं बाळ घरी ठेऊन भारती सिंग सेटवर, म्हणाली...

अनुष्का शर्माच्या ‘क्लिन स्लेट' ओटीटी’ या निर्मिती संस्थेने साकारलेल्या 'माई' (mai) या वेब सीरिजमध्ये साक्षी मुख्य भूमिकेत आहे. (sakshi tanwar new web series 'MAI' on netflix) या संस्थेची ही पहिली स्त्रीप्रधान कलाकृती आहे. पांढरपेशी विश्वातील राजकारणाचा बळी ठरलेल्या एका सर्वसामान्य आईची कहाणी ‘माई’ या वेब सिरीजमधून दाखवण्यात येणार आहे. 'शीला' असे पात्र साक्षीने साकारले आहे. आपल्या मुलीसोबत घडलेला कटू प्रसंग, त्यानंतर तिचा झालेला मृत्यू अशा आश्चर्यकारक घडामोडी या शीला (साक्षी तन्वर) यांच्या आयुष्यात घडतात. सरळसोटपणे चाललेल्या त्यांच्या आयुष्यात मात्र अचानकच हे वादळ येते. यातील सत्य काय आहे याचा तपास घेण्यासाठी आणि न्यायाच्या शोधात असलेल्या शीलाला न्याय मिळतो का, याची उकल या वेब सिरीज मध्ये करण्यात आली आहे. नेटफ्लिक्स वर ही सिरीज पाहता येणार आहे.

हेही वाचा: Photo: झगा झगा, मला बघा.. सई ताम्हणकरचा झगा पाहून डोळे फिरतील...

एक स्त्री केंद्री वेब सिरीज म्हणून हा वेगळा प्रयोग ठरणार आहे. यात संघर्ष आहे, जिद्द आहे, परिस्थिती विरोधात बंड करण्याची उमेदही आहे. कोणाचीही मदत न घेता ती एकटीच या सगळय़ाचा शोध घेऊ पाहते तेव्हा एकटय़ाने धाडस करणाऱ्या तिच्यासारख्या स्त्रीला अनेकांचा विरोध कसा पत्करावा लागतो याचे दर्शन या सिरीजमध्ये घडणार आहे. शिवाय प्रत्येक टप्प्यावर नवनवीन रहस्य उलगडत जात असल्याने चाहत्यांसाठी ही सिरीज एक परफेक्ट पॅकेज असणार आहे.

आजूबाजूला घडणाऱ्या हिंसक घटनांचा शोध घेत असताना अनेक नवनवी गुपितं शीलासमोर उघड होतात. या सगळय़ातून आपल्या मुलीच्या मृत्यूमागचे गूढ अधिकच बिकट होत असल्याची जाणीव तिला होते. पण मुलीच्या मृत्यूमागील सत्य समोर असण्यासाठी ती जंगजंग पछाडत असल्याने तिला यश येणार, की ती अधिकच यात गुंतणं पडणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. ‘माई’चे लेखन अतुल मोंगिया, तमल सेन, अमिता व्यास यांनी केले असून दिग्दर्शन अन्षाई लाल आणि अतुल मोंगिया यांनी केले आहे. तर साक्षी तन्वर, विवेक मुश्रन, वामिका गब्बी, अनंत विधांत, रायमा सेन, अंकूर रतन, प्रशांत नारायण आणि वैभव राज गुप्ता या कलाकारांनी आपल्या अभिनयाने अधिकच रंजकता आली आहे.

Web Title: Sakshi Tanwar New Web Series Mai On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top