Salaar Part 1 Ceasefire Teaser : चक्क मोदींच्या आवाजात प्रभासच्या सालारचा टीझर! काय म्हणाले मोदीजी?

टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास हा आता जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये लोकप्रिय झाला आहे.
Salaar Part 1 Ceasefire Teaser
Salaar Part 1 Ceasefire Teaseresakal

Salaar Part 1 Ceasefire Teaser: टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास हा आता जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये लोकप्रिय झाला आहे. प्रख्यात दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटानं प्रभासला वेगळी ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर त्यानं जेवढे चित्रपट केले त्यासरशी तो प्रचंड लोकप्रिय झाला.

आता प्रभासचा सालार हा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असणारा प्रोजेक्ट आहे. त्याच्या ट्रेलरची तारीखही समोर आली आहे. या सगळ्यात त्याचा जो टीझर व्हायरल झाला आहे त्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्या टीझरमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रभासचा सालार हा वैशिष्ट्यपूर्ण ठरताना दिसतो आहे. सालार पार्ट १ सीझफायची उत्सुकता मोठी आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

यापूर्वी प्रभासच्या चित्रपटाचे प्रदर्शनापूर्वी एवढ्या प्रमाणात कौतुक झाले नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. जेवढे ते सालारचे झाले आहे. त्याचा फर्स्ट लूक, त्यातील टीझर आणि त्यात पंतप्रधान मोदी यांचा आवाज हा वेगळ्याच प्रतिक्रियांचा विषय आहे. मोदींचे वेगवेगळे डायलॉग्ज अन् सालारचे ते सीन्स याची जादू प्रेक्षकांच्या मनावर आहे. प्रतिक्रियांच्या माध्यमातून ते आणखी प्रभावीपणे जाणवते.

ज्यावेळी एआय जनरेटेड व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा त्यातील मोदींच्या त्या भाषणाची चर्चा होती. मोदीजी जेव्हा अॅक्शन एंटरनेटर म्हणून तो डायलॉग बोलतात तेव्हा प्रभासची समोर येणार प्रतिमा खूप काही सांगून जाणारी आहे. त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

होबाळे फिल्मसच्या वतीनं सालार १ सीझफायरची निर्मिती करण्यात आली आहे. याच वर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी प्रभासचा राधेश्याम प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. बॉक्स ऑफिसवर तो विक्रमी कमाई करेल असा अंदाजही बांधला जात आहे.

Salaar Part 1 Ceasefire Teaser
Rashmika Viral Video : रश्मिकाचा 'तो' व्हिडिओ, अमिताभ बच्चन यांचा संताप! 'कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी', नेमकं घडलं काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com