Salaar Vs Dunki : होणार मोठी फाईट! कोण जिंकणार, 'बाहुबली' की 'किंग खान'?

शाहरुख आणि प्रभास या दोन्ही सेलिब्रेटींचे चित्रपट एकमेकांसमोर येणार आहे. त्यात कुणाची सरशी होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Salaar Vs Dunki social media viral war
Salaar Vs Dunki social media viral waresakal
Updated on

Salaar Vs Dunki: शाहरुखचा जवान प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड असल्याचे दिसून आले आहे. त्यानं आतापर्यत सातशे कोटींची कमाई केली आहे. केवळ भारतच नाही तर परदेशातही जवानला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे दिसून आले. यासगळ्यात शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

डिसेंबरमध्ये शाहरुखचा डंकी आणि साऊथचा प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा सालार चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रदर्शनाच्या तारखाही आता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात किंग खान आणि बाहुबली यांच्यात जोरदार टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर तर किंग खान विरुद्ध बाहुबली अशा प्रकारच्या पोस्ट सुरु झाल्या आहेत. चाहत्यांमध्ये देखील संघर्ष पेटताना दिसतो आहे.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

होमबेल फिल्म्सने सोशल मीडियावर त्यांच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर व्हायरल केले असून त्यावरुन चर्चा सुरु झाली आहे. सालार हा डिसेंबरच्या २२ तारखेला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे येत्या काळात डंकी विरुद्ध सालार अशी फाईट होणार असल्याचे कन्फर्म आहे. असे चाहत्यांचे म्हणणे आहे. या वर्षा किंग खानचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यातील दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण प्रदर्शित झाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर तब्बल एक हजार कोटींची कमाई केली होती. दुसरीकडे जवाननं सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डंकी किती कोटींची कमाई करतो याकडे चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यात सालारची जोरदार टक्कर शाहरुखला असणार आहे. त्याचा परिणाम डंकीवर होणार का, असा प्रश्न दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना पडला आहे.

Salaar Vs Dunki social media viral war
Shah Rukh Khan : 'विराट कोहली जावई आहे आपला'! किंग खान असं का म्हणाला?

एका नेटकऱ्यानं या दोन्ही चित्रपटांविषयी केलेली कमेंट चर्चेत आहे. तो म्हणतो, हिंदी प्रेक्षकांकडून डंकी किमान सहाशे कोटींची कमाई करेल तर साऊथच्या ऑडियसकडून ३०० कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा चित्रपट हजार कोटींच्या आसपास कमाई करेल. दुसरीकडे सालार देखील नऊशे कोटींची कमाई करु शकतो असे त्या नेटकऱ्याचे म्हणणे आहे.

सालार पासून किंग खानला कोणती भीती आहे का, असल्यास तो येणाऱ्या दिवसांत काही वेगळा निर्णय घेऊ शकतो का, असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com