esakal | 19 वर्षांनंतर सलमान-भन्साळी येणार एकत्र
sakal

बोलून बातमी शोधा

19 वर्षांनंतर सलमान-भन्साळी येणार एकत्र

अभिनेता सलमान खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे दोघे आता एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केले नाही. मात्र, आता तब्बल 19 वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे.

19 वर्षांनंतर सलमान-भन्साळी येणार एकत्र

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे दोघे आता एका चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केले नाही. मात्र, आता तब्बल 19 वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे.

'हम दिल दे चुके सनम' हा प्रेमकथेवर आधारित चित्रपट 1999 मध्ये प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटामध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर आता एका चित्रपटात हे एकत्र दिसणार आहेत. 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट त्यावेळी मोठ्या प्रमाणात गाजला होता. अजूनही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. भन्साळी आता एका नव्या चित्रपटाची निर्मिती करत असून, त्यांच्या या चित्रपटामध्ये सलमान झळकणार आहे. 

दरम्यान, भन्साळी यांच्या चित्रपटाचे यावर्षी चित्रीकरण केले जाणार असून, 2020 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबतची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन दिली.

loading image