salman khan new photo
salman khan new photoEsakal

Salman Khan: फोटोशॉप करुनही तू म्हाताराच दिसतोस! सलमानच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Salman Khan And Alizeh Agnihotri Photos: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्यातच सलमानने रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांना विचार करायला भाग पाडले होते. सलमानने इंस्टाग्राम अकाउंटवर एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला होता.

मात्र या फोटोमध्ये फक्त एक मुलगी दिसत होती, या मिस्ट्री गर्लने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले होते. हा फोटो शेअर करताना सलमान खानने लिहिले होते, 'मी नेहमी तुझ्यासोबत उभा राहीन...'.

मग काय काही तासातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सर्वांना भाईजान आता लग्न करणार की काय असं वाटतं होते. सलमानच्या चाहत्यांनी या फोटोवर अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या. तो दुसऱ्या दिवशी या फोटोबद्दल सांगेल असं त्याने लिहिलं होत. आता सलमानने अखेर त्या मिस्ट्री गर्लचा खुलासा केला आहे.

salman khan new photo
Sankarshan Karhade: "६ दिवस , २१ विमान प्रवास , १३ शहरं", संकर्षणने सांगितला अमेरिका नाटक दौऱ्याचा भन्नाट अनुभव

आता सलमान खानने सोशल मीडिया हँडलवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान खान सोबत त्याची भाची अलिजेह अग्निहोत्री दिसत आहे. म्हणजेच ती मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नाही तर ती सलमानची भाची अलिजेह आहे.

सलमान खान आणि अलिझेह अग्निहोत्री यांनी या फोटोंमध्ये एकाच रंगाचे आणि पॅटर्नचे कपडे घातले आहे.

salman khan new photo
Vidya Balan: काय सांगता विद्या एका मुलीची आई? शेवटी अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, "ती माझी..."

तर सलमानने या पोस्टसोबत कॅप्शन लिहिले आहे, 'प्रेम आणि काळजी आमच्या जीन्समध्ये आहे... आम्ही फक्त आम्ही आहोत. सलमान खानने त्याच्या बिइंग ह्युमन या फाउंडेशनच्या कपड्यांच्या ब्रँडमध्ये आता त्याची भाची अलीझेह अग्निहोत्रीचा समावेश केला आहे.

मात्र या घोषणेपेक्षा जास्त चर्चेत आला तो फोटोमधील सलमान खानचा लूक. या फोटोत सलमान खान डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. तर अनेकांनी त्याला ही फोटोशॉपची कमाल असल्याचं सांगितलं आहे.

salman khan new photo
Suniel Shetty: 'बॉलीवूडचा खेळ आता संपलाय! इंडस्ट्रीमध्ये पहिल्यासारखी....' अण्णा काय बोलून गेला?

आता चाहते सलमान खानच्या या पोस्टवर जोरदार कमेंट करत आहेत. तर अनेकांनी भाईजानच्या वयाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाले तर सलमान खान शेवटचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसला होता. आता सलमान लवकरच मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील असणार आहे. येत्या दिवाळीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com