esakal | सलमान पुन्हा गोत्यात,'बिइंग ह्युमनच्या' नावाखाली फ्रॉड
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

सलमान पुन्हा गोत्यात,'बिइंग ह्युमनच्या' नावाखाली फ्रॉड

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता सलमान खान (salman khan) हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वास्तविक सलमान वादात सापडणे हे काही त्याच्यासाठी नवं नाही. मात्र आताच्या वादात त्याच्या बहिणीचे नाव आल्यानं त्याच्याभोवतीची डोकेदुखी वाढली आहे. सलमान आणि त्याची बहिण अलवीरा खान (alvira khan) यांना चंदीगढमध्ये केलेल्या एका फसवणूकीबाबत तेथील स्थानिक पोलिसांनी समन्स पाठवले आहे. या दोघांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. (salman khan and sister alvira khan got notice from chandigarh police in fraud case)

गेल्या काही दिवसांपूर्वी केआरके अर्थात कमाल खान आणि सलमानमध्ये जोरदार व्टिटर वॉर सुरु झाले होते. त्यात केआरकेनं सलमानच्या राधे चित्रपटाचा रिव्ह्यु केला होता. त्यावेळी केआरकेन सलमानच्या बिइंग ह्युमन या एनजीओच्या गैरकारभाराबद्दलही प्रतिक्रिया दिली होती. आता त्याच प्रकरणावरुन चंदीगढ पोलिसांनी सलमान आणि त्याच्या बहिणीला नोटीस पाठवली आहे. सलमानशिवाय आणखी सात जणांना देखील नोटीस पाठविण्यात आली आहे.

एनआयच्या व्टिटनुसार चंदीगढचे एस पी केतन बंसल यांनी सांगितले की, सलमान आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना येत्या 13 जुलै पर्यत उत्तर द्यावे लागणार आहे. त्यात काही गैरप्रकार दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, सलमान खान आणि आणखी काही लोकांना जी नोटीस पाठवण्यात आली त्याबाबत व्यापारी अरुण गुप्ता म्हणाले, आम्हाला बिइंग ह्युमनची फ्रंचाईसी सुरु करण्यासाठी दोन कोटी रुपये भरण्यास सांगितले. त्या दुकानाच्या उद्घघाटनसाठी सलमान येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

हेही वाचा: समुद्रकिनारी त्रिधाचा 'हॉट अंदाज', फोटो असे की....

हेही वाचा: आदिवासी समाजावर वादग्रस्त वक्तव्य, संभावनाला पडलं महागात

सलमानच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो अंतिम आणि टायगर 3 मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा बहुचर्चित राधे नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र तो काही फार चालला नाही. त्या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली होती.

loading image