esakal | 'अंतिम'चं 'हाय ऑक्टेन मोशन पोस्टर'; सलमान आयुषचा कडक लूक!
sakal

बोलून बातमी शोधा

'अंतिम'चं 'हाय ऑक्टेन मोशन पोस्टर'; सलमान आयुषचा कडक लूक!

'अंतिम'चं 'हाय ऑक्टेन मोशन पोस्टर'; सलमान आयुषचा कडक लूक!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे त्याचा अंतिम द फायनल ट्रुथ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे. त्या व्हायरल झालेल्या पोस्टरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सलमान खान फिल्म्सने 'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या मोशन पोस्टरचे अनावरण केलं आहे. दोन शक्तिशाली व्यक्तींमधील एक जबरदस्त अॅक्शन ड्रामा म्हणून या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल.

या चित्रपटामध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा या दोन्ही कलाकारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यात एक पोलीस अधिकारी आहे तर आणि दूसरा गँगस्टर, ज्याची परिणति दोघांमधील भयंकर संघर्षात होते. 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' एका गँगस्टरची कहाणी आहे. जो कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना मात देण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे पोस्टर, कमालीचे प्रभावी आहे. प्रेक्षकांना ते भावले आहे. जो आपल्या क्रुद्ध नजरेनं आपल्या प्रतिद्वंद्वीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. त्याचवेळेस पोस्टर अगदी सहजपणे सलमानच्या बाजूने बदलते, त्याच्या डोळ्यांमध्ये देखील तेवढेच दृढ़, शासित आणि चलाख भाव दिसतात. तो मागे हटत नाहीये आणि आपल्या लक्ष्यावर विजय मिळवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यासाठी निग्रही आहे.

एकूणच, चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना हे पोस्टर आपल्या आवडत्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर एक्शनमध्ये पाहण्याचे सर्वात मोठे कारण प्रदान करते. हा चित्रपट झी स्टूडियोजद्वारे 26 नोव्हेंबर, 2021ला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना अभिनीत, 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' महेश वी मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. त्याची निर्मिती सलमा खान यांनी केली आहे.

हेही वाचा: आर्यन खान प्रकरणावर रवीनाची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली...

हेही वाचा: शाहरुखच्या मुलामुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत, पोलिसांकडे तक्रार

loading image
go to top