Salman Khan Birthday: शाहरुख सलमानची गळाभेट... एवंढ प्रेम उतू... व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Birthday

Salman Khan Birthday: शाहरुख सलमानची गळाभेट... एवंढ प्रेम उतू... व्हिडिओ व्हायरल

आज इंडस्ट्रीचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. त्यांच्या चाहत्यांसाठी त्याचा बर्थडे हा एखाद्या सणापेक्षा कमी नाही. या खास प्रसंगी, सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी त्यांच्या घरी जंगी पार्टीचं आयोजन केले होतं.

ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स दिसले होते. पण या लेट नाईट पार्टीत अशी व्यक्ती आली ज्याच्यामूळं पार्टीची रंगतच वाढली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बर्थडे बॅशमध्ये शाहरुख खानही पोहोचला होता, आता शाहरुख आणि सलमानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

हेही वाचा: Salman Khan Birthday: भाईजान अन् त्याचे वाद... लिस्ट बरीच लांब.....

संगीता बिजलानी पासून टीव्ही अँकर रजत शर्माने पार्टीला हजेरी लावली. पण रात्री 3 वाजता सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्याने इंटरनेटवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. कारण या व्हिडिओमध्ये सलमान खानला शुभेच्छा देण्यासाठी आलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून शाहरुख खान होती. दोन्ही स्टार्संनी पापाराझींना भरपूर पोज दिल्या, तसेच या फोटो आणि व्हिडिओमध्ये त्यांची मैत्री स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा:जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

हेही वाचा: Salman Khan Birthday: 'तर आतापर्यंत आजोबा बनलो असतो..', जेव्हा सलमाननं दिली होती पहिल्या प्रेमाची कबुली..

सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला शाहरुख खान उशिरा पोहोचला. गाडीतून खाली उतरताच तो थेट घराच्या आत गेला. नंतर शाहरुख पार्टीतून बाहेर पडू लागला तेव्हा सलमान स्वत: त्याला बाहेर सोडायला आला. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि बोलतांना दिसत होते. मग पुन्हा पापाजींनी त्याला पाहून जोरात ओरडायला सुरुवात केली आणि पोझ देण्याची मागणी केली.

दोघेही पुढे आले आणि फोटो क्लिक केले. यादरम्यान दोघांचे बॉन्डिंग पाहण्यासारखे होते. आणि चाहते 'करण- अर्जुन ' एकत्र असं ओरडत होते. विशेष म्हणजे शाहरुख आणि सलमान एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसतात. शाहरुख खानच्या 'पठाण'मध्ये सलमानही छोट्या भूमिकेत दिसणार आहे.