Salman Khan Birthday: काळवीट शिकार ते ऐश्वर्या राय अन् विवेक! भाईजान अन् त्याचे वाद... लिस्ट बरीच लांब...

आज सलमान खानचा 58 वा वाढदिवस!
Salman Khan Birthday
Salman Khan BirthdayEsakal

Salman Khan Birthday: सलमान खान बॉलिवूडमधील अशा स्टार्सपैकी एक आहे, जो नेहमीच चर्चेत असतो. सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनाही लाँच केले आणि अनेक स्टार्सना आर्थिक मदतही केली. त्यामुळे सलमान खानला बॉलिवूडचा भाईजान म्हणतात.   सलमान खानच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सलमान खानचे काही गाजलेले वाद सांगणार आहे.

सलमान खान अन् काळवीट शिकार वाद
सलमान खान अन् काळवीट शिकार वाद Sakal

सलमान खान अन् काळवीट शिकार वाद

बॉलिवूडचा दबंग सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय चिंकारा शिकार प्रकरणातही सलमान खानला तुरुंगात जावे लागले होते. 'हम साथ साथ हैं' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा वाद झाला होता.

रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलमसोबत शिकारीसाठी बाहेर पडले होते आणि त्यांनी दोन काळवीटांना गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणात सलमान खानला तुरुंगात जावे लागले होते.

Salman Khan Birthday
Salaar Box Office Scam: प्रभासच्या 'सालार'च्या कमाईचे आकडे खोटे? सोशल मिडियावर का होतोय सालार बॉक्स ऑफिस स्कॅम ट्रेंड?
सलमान खान हिट अँड रनचा वाद
सलमान खान हिट अँड रनचा वाद Sakal

सलमान खान हिट अँड रनचा वाद


हिट अँड रन प्रकरणातही सलमान खानला तुरुंगात जावे लागले होते. वृत्तानुसार, मुंबईतील वांद्रे भागात एका बेकरीबाहेर झोपलेल्या लोकांना टोयोटा लँड क्रूझर कारने धडक दिली होती. त्यावेळी सलमान खान हे वाहन चालवत होता, असा या प्रकरणात आरोप होता.

या अपघातात चार जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सलमान खानला त्याच्या घरातून अटक केली होती, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी सलमान खानने न्यायालयात सांगितले होते की, हा अपघात झाला तेव्हा तो ड्रायव्हिंग सीटवर बसला नव्हता आणि तो दारूच्या नशेतही नव्हता.

Salman Khan Birthday
Salman Khan Birthday: पहिली कमाई ७५ रुपये, आज करोडो छापतोय, वाचा सलमानची दबंग स्टोरी
सलमान खान ऐश्वर्या रायचं भांडण
सलमान खान ऐश्वर्या रायचं भांडण Sakal

सलमान खान ऐश्वर्या रायचं भांडण

संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके सनममध्ये एकत्र काम करताना सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय जवळ आले होते. पण सलमान ऐश्वर्याबद्दल इतका पझेसिव्ह झाला होता की तो तिच्यावर जास्तचं अधिकार गाजवू लागला.

ते ऐश्वर्याला प्रत्येक गोष्टीत अडवू लागला. ऐश्वर्या ज्या हिरोसोबत काम करायची त्याच्यावर सलमान संशय घेत असे. रिपोर्ट्सनुसार, एका रात्री सलमान खान ऐश्वर्याच्या बिल्डिंगमध्ये पोहोचला, त्याने त्यावेळी तो दारुच्या नशेत होता.

त्याने ऐश्वर्याचा दरवाजा ठोठावला. सलमान खानने ऐश्वर्याला मारहाण केली आणि तिच्या वडिलांसोबतही गैरवर्तन केल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी ऐश्वर्याच्या वडिलांनी सलमानविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची बातमीही चर्चेत होती. त्यानंतर ऐश्वर्याने त्याच्याशी ब्रेकअप केलं.

Salman Khan Birthday
Urfi Javed: उर्फी जावेद रेस्टोबॉरमध्ये झाली वेटर, अभिनेत्रीने खरं कारण सांगताच लोकांनी केलं कौतुक
विवेक ओबेरॉयसोबत सलमान खानचा वाद
विवेक ओबेरॉयसोबत सलमान खानचा वादSakal

विवेक ओबेरॉयसोबत सलमान खानचा वाद

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील शीतयुद्ध सर्वांनाच माहित आहे. असं म्हणतात की, ऐश्वर्या रायमुळे दोघांमध्ये भांडण सुरू झाले होते. विवेक ओबेरॉयने पत्रकार परिषद घेऊन सलमान खानवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप केला.

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील हा वाद मीडियामध्ये खूप चर्चेत होता. त्या दिवसांत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्याच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. नंतर विवेक ओबेरॉयने सलमान खानची माफी मागितली, जेणेकरून त्यांच्यातील शीतयुद्ध संपले असं वाटतं असंल तरी तसं झालं नाही.

सलमान खानने विवेक ओबेरॉयला माफ केले नाही. सलमान खानशी पंगा घेतल्याने विवेक ओबेरॉयचे बॉलिवूडमधील करिअर फारसं चांगलं झालं नाही, असं अनेक बॉलिवूड तज्ज्ञांचं मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com