Salman Khan Birthday: 'तर आतापर्यंत आजोबा बनलो असतो..', जेव्हा सलमाननं दिली होती पहिल्या प्रेमाची कबुली..

सलमान खानच्या पहिल्या लव्हस्टोरीचा अंत हा त्याच्या मनातील एका भीतीमुळे झाला होता,त्यानं बिग बॉसच्या मंचावर हे जाहिरपणे बोलून दाखवले होते.
Salman Khan Birthday: Salman First Love story
Salman Khan Birthday: Salman First Love storyGoogle

Salman Khan Birthday: सलमान खानचा बर्थ डे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी सोहळा असतो. ५७ वर्षाचा झालाय दबंग खान आज..आतापर्यंत त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक रेकॉर्ड त्यानं केलेयत. कितीतरी अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलंय.. हा तर त्याच्या बाबतीत चर्चेचा विषय राहिला आहे. त्याच्या लग्नावरनं तर अनेकदा त्याला प्रश्न विचारला जातो तेव्हा तर काही ना काही बोलून तो विषय टाळतो.

बॉलीवूडमध्ये जेव्हा जेव्हा कोणत्याही अभिनेत्री सोबत त्याचं नाव जोडलं गेलं ती बातमी जगभरात पसरली. असेच एकदा सलमानने आपल्या बालपणीच्या क्रशविषयी उल्लेख केला होता. त्यानं सांगितलं होतं की जर त्यानं लग्न केलं असतं तर आता तो आजोबा देखील बनला असता. आज २७ डिसेंबरला सलमान आपला वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग,आजच्या खास दिनी दबंग खानशी जोडलेल्या खास गोष्टी जाणून घेऊया. (Salman Khan Birthday: Salman First Love story)

Salman Khan Birthday: Salman First Love story
Tunisha Sharma Death: लग्नासाठी तुनिषावर धर्म बदलण्याची शीजाननं केलेली सक्ती?, यामुळे बळावला पोलिसांचा संशय..

सलमान जेव्हा बिग बॉस १३ चा सिझन होस्ट करत होता तेव्हा अजय देवगण आणि काजोल आपल्या 'तानाजी- द अनसंग वॉरियर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. अजय आणि काजोल समोर सलमाननं आपल्या त्या पहिल्या-वहिल्या प्रेमाची कबूली दिली होती. ज्या मुलीवर त्याचं मनापासून प्रेम होतं, तिची नातवंड त्याचे चाहते आहेत असं सलमान म्हणाला होता.

Salman Khan Birthday: Salman First Love story
Tunisha Suicide करण्याच्या २० मिनिटे आधीच ड्रायव्हरनं फोनवर अभिनेत्रीच्या आईला दिलेली माहिती..म्हणालेला..

सलमाननं सांगितलं की त्यावेळी तिला त्यानं मनातलं सांगितलं नाही कारण त्याला वाटत होतं ती आपल्या रिजेक्ट करेल. तो म्हणाला,''मला खरंच ती मुलगी खूप आवडायची पण तिला मी कधीच मनातलं सांगू शकलो नाही. मला वाटायचं मी तिला विचारलं तर मला ती रीजेक्ट करेल. माझे तीन मित्र होते ज्यांनी तिला काही काळ डेटही केलं होतं. आणि मला नंतर कळालं की तिला मी आवडायचो''.

Salman Khan Birthday: Salman First Love story
Tunisha Sharma : दहा दिवसांपूर्वी तुनिषाला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं; काकाचा धक्कादायक खुलासा

सलमान म्हणाला,''जवळपास १५ वर्षापूर्वी मी तिला भेटलो..पण तेव्हा देखील मी तिला काहीच सांगू शकलो नाही''. जेव्हा अजय देवगणने याचं कारण विचारलं तेव्हा सलमाननं उत्तर दिलं होतं की, ''कारण १५ वर्षापूर्वी जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती आजी बनली होती. ती म्हणाली, माझे नातू तुझे चाहते आहेत. त्यांना तुझे सिनेमे आवडतात''. यावर सलमान,अजय आणि काजोल पोट धरून हसू लागले होते. पुढे सलमान म्हणाला,''विचार करा,जर मी तेव्हाच लग्न केलं असतं तर आतापर्यंत आजोबा बनलो असतो''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com