Blackbuck Case: सलमानला माफ करायला लॉरेन्स का तयार नाही? |Salman Khan Blackbuck Poaching Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan news

Blackbuck Case: सलमानला माफ करायला लॉरेन्स का तयार नाही?

Salman Khan Blackbuck Poaching Case: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली (Bollywood News) होती. त्यानंतर बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. सलमानवर काही मोठ्या याचिका दाखल आहेत. त्यापैकी एक म्हणजे (salim khan and salman khan news) राजस्थानमधील काळवीट प्रकरण. हम साथ साथ है या चित्रपटाच्या वेळी त्यानं एका काळवीटाची शिकार केली होती. त्याप्रकरणी स्थानिक बिष्णोई समाजाच्या व्यक्तींनी सलमानच्या विरोधात तक्रार केली होती. सध्या त्या केसवरुन सलमान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सलमानला ज्यानं जीवे मारण्याची धमकी दिली होती त्या लॉरेन्स बिष्णोईनं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं आपण सलमानला (entertainment news) मारण्यासाठी चार लाख रुपयांची रायफल खरेदी केल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता त्यानं म्हटलं आहे की, लॉरेन्स बिष्णोईनं कोर्टानं भलेही त्यांचा निर्णय देऊ दे मात्र काळवीट शिकार प्रकरणात आपण सलमानला माफ करणार नाही. त्यानं केलेल्या कृत्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबद्दल त्यानं माफीही मागितलेली नाही.

लॉरेन्सचं म्हणणं आहे की, मी तेव्हाच माझ्या निर्णयावर विचार करेल जेव्हा सलमान आणि त्याचे वडील समस्त समाजाची माफी मागतील. लॉरेन्सकडे जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा त्यानं सांगितलं की, आम्ही लोकं काळवीटाला महत्वाचं स्थान देतो. आमचे जे धार्मिक गुरु आहेत त्यांचा पुनर्जन्म म्हणजे ते काळवीट आहे. त्याच्याशी आमचे भावनिक नाते जोडले गेले आहे. त्यामुळे त्यावर कुणी घाला घालत असेल तर ते चूकीचे आहे. हे मला सांगायचे आहे.

काळवीटाला आम्ही भगवान जंबेश्वर यांच्या नावानं देखील ओळखतो. त्यामुळे सलमानच्याबाबत कोर्टानं कोणताही निर्णय देऊ दे त्यानं माफी मागावी ही गोष्ट महत्वाची आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगस्टर लॉरेन्सनं सांगितलं होतं की, 2018 मध्ये त्यानं सलमानला मारण्याचा कट रचला होता. आणि त्यासाठी चार लाख रुपयांची रायफल देखील खरेदी केली होती. बिष्णोई समाजाच्या मनात सलमानविषयी प्रचंड राग होता.