Salman Khan Birthday: ईदच्या दिवशीच सिनेमे रिलीज का करतो सलमान खान? समोर आलं 'हे' कनेक्शन

समिक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करत सलमान आणि ईदचं खास कनेक्शन समोर आणलं आहे.
Salman Khan eid release movies buisness kisi ka bhai kisi ki jaan ppm81
Salman Khan eid release movies buisness kisi ka bhai kisi ki jaan ppm81SAKAL

Salman Khan Birthday: सलमान खान आणि ईदचं खास कनेक्शन आहे. या खास दिवशी असलेल्या आपल्या चाहत्यांच्या सुट्टीचा आनंद मजेदार करण्यासाठी सलमान खान नेहमीच ईदला त्याचे सिनेमे रिलीज करतो.या दिवसानं देखील सलमान खानला कधी नाराज नाही केलं.

त्याचे जे-जे सिनेमे ईदला रिलीज झाले त्यांनी पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. आता सलमान खान या ईदला 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा घेऊन येत आहे.

सलमान खानच्या या सिनेमाच्या रिलीज आधीच सिने समिक्षक आणि अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी सलमान खानच्या याआधीच्या सिनेमांची बॉक्सऑफिसवरची परिस्थिती सांगितली आहे,त्यांना चाहत्यांनी अनेक सवाल देखील केले आहेत. आज सलमानच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घ्या ईद आणि भाईजानचं खास कनेक्शन. (Salman Khan eid release movies buisness kisi ka bhai kisi ki jaan)

Salman Khan eid release movies buisness kisi ka bhai kisi ki jaan ppm81
Shamita Shetty: 'मावशी तू कसली भारीये!' राज कुंद्राच्या मुलाची भन्नाट कमेंट

तरण आदर्श यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''चार वर्ष वाट पाहिल्यानंतर सलमानचा नवा सिनेमा ईदच्या दिवशी मोठा दबदबा निर्माण करत रिलीज होणार आहे. हा सिनेमा आहे 'किसी का भाई किसी की जान'.

यानंतर तरण आदर्शने ही माहिती देखील दिली आहे की २०२१ साली ईदला सलमानचा 'राधे' रिलीज झाला होता पण तेव्हा लिमिटेड स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज झाला होता. याव्यतिरिक्त २०१९ साली 'दबंग ३' आणि नोव्हेंबर २०२१ साली 'अंतिम' हे दोन्ही सिनेमे ईदला रिलीज होऊ शकले नव्हते.

यानंतर तरण आदर्शने हे देखील लिहिलं की ,''चला पाहूया यावेळेला सलमानच्या सिनेमाचा रिलीचा पहिला दिवस कसा राहिल?''

Salman Khan eid release movies buisness kisi ka bhai kisi ki jaan ppm81
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानचा 'लुंगी डान्स' संकटात .. दक्षिण भारतातील परंपरेचा अपमान झाल्याची होतेय ओरड..

तरण आदर्श यांनी आपल्या ट्वीटमध्ये ईदच्या दिवशी रिलीज झालेल्या सलमानच्या बाकी सिनेमांचा बिझनेस देखील सांगितला आहे. ईदला रिलीज होणाऱ्या सलमानच्या सिनेमांनी पहिल्या दिवशी किती कमाई केली,त्याची लिस्ट काहीशी अशी आहे.

२०१० साली रिलीज झालेल्या 'दबंग' सिनेमानं पहिल्या दिवशी १४.५० करोड, २०११ साली 'बाडीगार्ड'नं २१.६० करोड, २०१२ साली रिलीज झालेल्या 'एक था टायगर'नं ३२.९३ करोड, २०१४ साला रिलीज झालेल्या 'किक' नं २६.४० करोड, २०१५ साली 'बजरंगी भाईजान'नं २७.२५ करोड, २०१६ साली 'सुल्तान'नं ३६.५४ करोड, २०१७ साली 'ट्युबलाइट'नं २१.१५ करोड, २०१८ साली 'रेस'नं २९.१७ करोड,२०१९ साली रिलीज झालेल्या 'भारत' नं ४२.३० करोड कमावले होते. आता सगळ्यांच्याच नजरा आगामी 'किसी का भाई,किसी की जान' सिनेमावर खिळल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com