IIFA 2022: 'सॉरी,चूक झाली'; रितेशनं थेट सलमानची माफीच मागितली,काय घडलं?

तब्बल दोन वर्षांनी यंदा IIFA 2022 पुरस्कार सोहळा होणार आहे. ओपनिंग सेरिमनीला सिने-इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आवर्जुन उपस्थित होते.
Salman Khan gets upset with Riteish Deshmukh during the press conference?
Salman Khan gets upset with Riteish Deshmukh during the press conference?Google

'आयफा २०२२'(IIFA 2022) सोहळा ज्याची प्रतिक्षा संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीलाच नाही तर चाहत्या वर्गालाही असते. अशा या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. गुरुवारी २ जून,२०२२ रोजी आयफा अॅवॉर्डे सोहळ्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी सिने-इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यामध्ये सलमान खान,रितेश देखमुख,सारा अली खान,नोरा फतेही,शाहिद कपूर ,दिव्या खोसला कुमार आणि हनी सिंग असे सगळे सोहळ्यात सामिल झाले होते. यावेळी सगळ्याच सेलिब्रिटींनी खूप एन्जॉय केल्याचं बोललं जात आहे. सगळ्या कलाकारांनी मीडियासोबत संवाद साधला. मीडियानं विचारलेल्या अनेक मजेदार प्रश्नांना सेलिब्रिटींनी दिलखुलास उत्तरं दिली. सगळेच म्हणाले की,'' ते खूप खूश आहेत कारण यावर्षी हा सोहळा होत आहे. गेली दोन वर्ष कोव्हिडमुळे आयफा अॅवॉर्ड सोहळा होऊ शकला नाही''. त्याचवेळी रितेश देशमुख(Riteish Deshmukh),सलमान खान(Salaman Khan), मनीष पॉल यांच्यामध्ये काही मजेदार गोष्टीही घडल्या ज्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Salman Khan gets upset with Riteish Deshmukh during the press conference?
'सरसेनापती हंबीरराव' पाहून राज ठाकरे चक्क २ तास...',तरडेंनी सांगितला किस्सा

त्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकाल की मनीष पॉल म्हणतो की,''भाईजान असतात तेव्हा खूप मजा येते. तर मग आपण सगळे मजा करणार आहोत. हे पाहून रितेशही तिथे येतो आणि म्हणतो कसा,मनीष हे मान्य करावंच लागेल की शो होस्ट करण्यात तुझा हात कुणी पकडूच शकत नाही,तू बेस्ट आहेस.'' आणि तो हे पुन्हा पुन्हा बोलत होता. तेवढ्यात सलमानची सटकली. अर्थात मजेमजेतच. रितेशच्या बोलण्यावर तो पटकन म्हणाला,''आणि मी?'' तेव्हा रितेश देशमुखनं चक्क ''सॉरी,माझ्याकडून चुकी झाली''. हे ऐकल्यावर सलमानही पटकन म्हणाला, ''अरे मी स्वतःच विसरलो होतो की मी देखील होस्टिंग करत आहे शो''.

आयफा अॅवॉर्ड २०२२ च्या ओपनिंग सेरीमनीतील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात हनी सिंग स्टेजवर एन्ट्री करत आहे. तेव्हा त्याला पाहून लोक ओरडायला लागतात,''यो यो हनी सिंग.....'' त्यानंतर मग हनी सिंग म्हणताना दिसत आहे की,''आयफा मध्ये तो आपल्या जुन्या गाण्यांवर परफॉर्म करणार आहे''. त्यानंतर स्टेजवर तो आपली काही प्रसिद्ध झालेली गाणी गातो आणि मग काय तिथे उपस्थित असलेले देखील त्याच्या गाण्याच्या तालावर ठेका धरतात.

Salman Khan gets upset with Riteish Deshmukh during the press conference?
'ज्ञानवापी' वादात अक्षयची उडी, अंधारात तीर मारीत म्हणाला,'ते शिवलिंग...'

माहितीसाठी सांगतो की,ही फक्त आयफाच्या ओपनिंग सेरीमनीची पार्टी होती पण जेव्हा मुख्य सोहळा होईल त्याला सलमान खान,रितेश देशमुख,मनीष पॉल होस्ट करतील. तर दुसऱ्या दिवशी फराह खान आणि अपारशक्ति खुराना शो होस्ट करताना दिसतील. आलिया भट्ट,वरुण धवन, नोरा फतेही देखाल आयफा सोहळ्यात परफॉर्म करताना दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com