Russia Ukraine War: सलमानची गर्लफ्रेंड युलिया पुतीनवर चिडली, 'तुम्ही आता...'| Salman Khan Girlfriend Iulia ventur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood iulia vantoor

Russia Ukraine War: सलमानची गर्लफ्रेंड युलिया पुतीनवर चिडली, 'तुम्ही आता...'

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजून काही संपण्याचे नाव घेत नाही. त्याची धग आता जगाला बसू लागली आहे. अनेकांनी या युद्धावर सडकून टीका केली आहे. सध्याच्या घडीला युद्ध (Bollywood Celebrity) कोणत्याच देशाला परवडण्यासारखे नाही याची जाणीव असताना देखील का हिंसाचार करण्यास प्राधान्य दिले जात आहे (salman khan) असा प्रश्न नेटकऱ्यांनी सोशल मीडियातून उपस्थित केला आहे. यासगळ्यात बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी देखील रशिया युक्रेनच्या (Bollywood News) युद्धाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पुतीन यांच्या राजकीय धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संवादातून हा प्रश्न सोडवावा असे त्यांचे म्हणणे आहे.

यासगळ्यात सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूरची प्रतिक्रिया सोशल (iulia vantoor) मीडियावर व्हायरल झाली आहे. तिनं पुतीन यांच्याप्रती नाराजी व्यक्त केली आहे. जे काही चालले आहे ते गंभीर असून युद्ध हा पर्याय असू शकत नाही असे म्हटले आहे. आपल्या परखड मतांसाठी युलिया ही नेहमीच ओळखली जाते. तिच्या वक्तव्याची चर्चा होते. सलमान आणि युलियाच्या रिलेशनशिपची अनेकदा चर्चा झाली आहे. त्यांच्या रिलेशनवरुन नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केले आहे. मात्र त्यांनी अजून ऑफिशियली कोणत्या प्रकारे आपल्या नात्याविषयी खुलासा केला नाही. सध्या युलियानं रशियाच्या अध्यक्षांविषयी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

हेही वाचा: Viral: शबाना आझमींच्या भाचीसोबत कॅब चालकानं...

युलियानं जाहिरपणे युक्रेनला सपोर्ट केलं आहे. याविषयी तिनं इंस्टावरुन एक पोस्टही शेयर केली आहे. त्यामध्ये एक व्यक्ती हातात फलक घेऊन उभा आहे. त्यावर लिहिलं आहे की, मी रशियन व्यक्ती आहे. आणि मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. दुसऱ्या फोटो मध्ये एक महिला दुसऱ्या महिलेची गळाभेट घेताना दिसत आहे. त्या फोटोंना नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. युलियानं यासगळ्या परिस्थितीवर लिहिलं आहे की, पुतीन यांनी अशोभनीय व्यक्तिमत्व आहे. ते चांगले नाहीत. पुतीन सारखे हुकूमशहा जे काही करत आहे त्याबद्दल काय बोलावं. रशियाच्या जनतेला दोष देऊ नका. त्यांची चूक नाही. असं युलियानं म्हटलं आहे.

Web Title: Salman Khan Girlfriend Iulia Ventur Reaction Russia Ukraine War

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..