esakal | सलमानने चाखली फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची चव

बोलून बातमी शोधा

Salman Khan
सलमानने चाखली फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची चव
sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान नेहमीप्रमाणे गरजूंच्या मदतीला धावून आला आहे. सलमानची 'बिइंग ह्युमन' नावाची संस्था आहे. या संस्थेमार्फत तो लोकांना मदत करत असतो. सलमानच्या या संस्थेने मुंबईतील फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसाठी दररोज चहा, नाश्त्याची व्यवस्था केली आहे. सलमानची बिइंग ह्युमन संस्था आणि 'आय लव्ह मुंबई' या दोन्ही संस्थांनी हे कार्य हाती घेतले आहे. तसेच बिइंग हंग्री नामक फूड ट्रकच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे.

मुंबईमधील 'भाईजान्स' नावाच्या एका हॉटेलमध्ये फ्रंटलाईन वर्कर्ससाठी देण्यात येणारा नाश्ता बनवला जातो. नुकतीच सलमानने या हॉटेलला सरप्राईज भेट दिली. सलमानने फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या नाश्त्याची चव चाखत तो चांगल्या प्रतीचा आहे हे निश्चित केले. यावेळी तो आपल्या वांद्रे येथील निवासस्थानाहून खाद्यपदार्थ तयार केले जात असणाऱ्या ठिकाणी पोहोचला. या वेळी सलमानने या सर्व मदत कार्याचा आढावा घेतला.

हेही वाचा : 'कोरोनाने माझा धडधाकट मित्र खाल्ला'; प्रवीण तरडे भावूक

संस्थांच्या वतीनं राहुल कानन एका मुलाखतीत म्हणाले, "यावेळी सलमाननं नाश्ता तयार करणाऱ्यांशी संवाद साधला. नाश्त्यामध्ये 5 हजार वर्कर्ससाठी पाव भाजी बनवण्यात आली होती. खुद्द सलमाननंही इथं भाजीची चव चाखली. सलमानने भाजीची चव आवडल्याचेही सांगितले, आणि यात नेमकं काय भावलं ते भाजी तयार करणाऱ्यांना सांगितलं."

पहिल्या लॉकडाऊनमध्ये 'बिइंग ह्युमन फाउंडेशन' संस्थेकडून जवळपास 2 लाख गरजवंतांना अन्नधान्य पुरवठा करण्यात आला होता. याशिवाय हजारो मजुरांना सलमाननं आर्थिक मदही देऊ केली होती. संकटाच्या या काळात अनेकजण मदतीचा हात देत असतानाच सलमानची ही मदत आणि खुद्द जाऊन मदकार्याचा आढावा घेणं सर्वांचीच मनं जिंकत आहे.

सलमान अनेक गरजूंना या संस्थेमधून मदत करतो. त्याच्या कार्याचे अनेक जण कौतुक करतात. सलमान खऱ्या अर्थाने आता मुंबईमधील फ्रंटलाईन वर्कर्सचा भाईजान झाला आहे.