ट्युबलाईटला मिळणार 4 हजार 350 स्क्रीन्स

टीम इ सकाळ
गुरुवार, 22 जून 2017

सलमान खानचा बहुचर्चित ट्युबलाईट जगभरातील 5 हजार 550 पडद्यांवर झळकणार आहे. आजवर बाॅलिवूडमधील हा सर्वात मोठा रिलीज असल्याचे मानले जाते. 

मुंबई : सलमान खानचा बहुचर्चित ट्युबलाईट जगभरातील 5 हजार 550 पडद्यांवर झळकणार आहे. आजवर बाॅलिवूडमधील हा सर्वात मोठा रिलीज असल्याचे मानले जाते. 

ट्युबलाईट या सिनेमास भारतात मिळाल्या 4 हजार 350 स्क्रीन्स मिळाल्या असून, तर जगभरात पाच हजार 550 सिनेमागृहात हा सिनेमा झळकणार आहे. येत्या तीन दिवसांत हा सिनेमा शंभर कोटींचा आकडा पार करेल अशी खात्री वर्तवली जाते. यापूर्वी दंगल आणि सुलतान या सिनेमांना यापूर्वी अनुक्रमे 4300 आणि 4200 स्क्रीन्स मिळाल्या होत्या.  

Web Title: salman khan new tubelight movie esakal news

टॅग्स