"तुझ्या बाळाला मी इंडस्ट्रीत लाँच करेन"; सलमानचं भारती सिंगला आश्वासन

पनवेलच्या फार्महाऊसवर भारतीचं बेबी शॉवर करण्यास दिली परवानगी
Salman Khan promises to launch Bharti Singh and Harsh Limbachiyaas child
Salman Khan promises to launch Bharti Singh and Harsh Limbachiyaas child

कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) सध्या गरोदर असून पती हर्ष लिंबाचियासोबत (Harsh Limbachiyaa) तिने नुकतीच बिग बॉस १५च्या सेटवर हजेरी लावली. रविवारच्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने (Salman Khan) भारतीच्या बाळाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाँच करण्याचं आश्वासन तिला दिलं. इतकंच नव्हे तर तिच्या डोहाळे जेवणासाठी पनवेलमधील त्याचं फार्महाऊस वापरण्याचीही परवानगी त्याने दिली. टॅलेंट-हंट शो 'हुनरबाज'च्या ग्रँड फिनालेपूर्वी बाळाचा जन्म होऊ शकतो, असं हर्ष आणि भारतीने सलमानला यावेळी सांगितलं. सलमानने या दोघांनाही शुभेच्छा दिल्या.

बॉलिवूडच्या 'भाईजान'कडून शुभेच्छा मिळाल्यानंतर भारती मस्करीत त्याला म्हणाली, "हो सर, आम्हाला तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे. तसंच, आम्हाला माझ्या बेबी शॉवरसाठी तुमच्या फार्महाऊसचीसुद्धा गरज आहे. कृपया मला ती जागा द्याल का?" यावर सलमानलाही हसू अनावर झालं. बेबी शॉवरसाठी फार्महाऊस वापरण्याची परवानगी त्याने दोघांना दिली. याच परिस्थितीचा फायदा उचलत पुढे हर्ष म्हणाला, "आम्हाला आमचं बाळसुद्धा इंडस्ट्रीमध्ये लाँच करायचं आहे आणि करण जोहरने त्यास नकार दिला आहे." तेव्हा सलमान त्यांच्या बाळालासुद्धा इंडस्ट्रीत लाँच करण्याचं आश्वासन देतो.

Salman Khan promises to launch Bharti Singh and Harsh Limbachiyaas child
'ही तर मिनी विराटच'; वामिकाच्या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सलमानचा होकार ऐकताच भारती कॅमेराकडे वळते आणि म्हणते, "ठरलं तर, सलमान खान हे भारती आणि हर्षच्या बाळाला लाँच करणार आहेत." 'हुनरबाज' या शोच्या प्रमोशननिमित्त अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीसुद्धा बिग बॉसच्या सेटवर हजेरी लावली होती. याशिवाय इतरही काही सेलिब्रिटी बिग बॉसच्या या भागात पहायला मिळाले. प्रज्ञा अग्रवाल आणि लुलिया वंतूर यांनीसुद्धा सेटवर हजेरी लावली होती. तर गुरु रंधावा त्याच्या नवीन 'मै चला' या गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्ट झाला होता. मिका सिंगसुद्धा त्याच्या नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आला होता.

बिग बॉस १५च्या सोमवारच्या भागात दोन स्पर्धकांचं एलिमिनेशन पार पडणार आहे. रविवारच्या भागात या एलिमिनेशनचा टीझर दाखवण्यात आला होता. आता घरातून बाहेर पडणारे हे दोन स्पर्धक कोण असतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com