हे तर 'टोनी स्टार्क'चं लाईट व्हर्जन! सलमानचा नवीन लूक, नेटकऱ्यांनी घेतली मजा..Salman Khan Trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Trolled:

Salman Khan Trolled: हे तर 'टोनी स्टार्क'चं लाईट व्हर्जन! सलमानचा नवीन लूक, नेटकऱ्यांनी घेतली मजा..

Salman Khan Trolled: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा काही न करताही चर्चेत असतो., त्याचा नुकताच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्याचवेळी आता सलमान त्याच्या टायगर या चित्रपटाची शुटिंगही करत आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान सलमान सोशल मिडियावर देखील चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमी चाहत्यांशी कनेक्ट असतो त्याच्या सोबत पोस्ट शेअर करत असतो. सलमानने नुकतेच त्याचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

वास्तविक सलमान खानने सोशल मीडियावर त्याचा अबू धाबीमधून आयफा 2023 लूक शेयर केला आहे. सलमान खानचा स्वॅग पाहून काही चाहते त्याचे कौतुक करत आहेत तर काही त्याची खिल्ली उडवत आहे. ज्यासाठी त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. यूजर्स त्याच्या लुकची खिल्ली उडवत आहेत.

सलमान खानने गुरुवारी त्याच्या इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमानने मरून कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची पँट घातली आहे. काळ्या रंगाचा चष्मा घातलेला सलमान यात खुपच रुबाबदार दिसत आहे. विषेश म्हणजे या फोटोत सलमानच्या दाढी आणि मिशाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सलमान खानने स्वतःच्या या फोटोसोबत लिहिले आहे, 'आयफा अबू धाबी.' सलमान खानचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला असून ते कमेंट करत आहेत. तर काहींना सलमानचा हा लूक पाहून हॉलिवूडचा टोनी स्टार्क आठवला आहे. त्यांनी सलमानची पुरती खिल्ली उडवली आहे.

सलमान खानच्या फोटोवर युजर्स कमेंट करत आहेत. एकाने लिहिले की, 'भारतीय टोनी स्टार्क मार्वल्सचा डब केलेला चित्रपट येणार आहे.' दुसर्‍याने लिहिलयं की 'भाऊचं हृदय पुन्हा तुटलं आहे आणि त्याला जाळवण्यासाठी ही फोटो पोस्ट केली आहेत'. तर एकानं त्यांला, 'स्वस्त टोनी स्टार्क.' असे अनेक कमेंट त्याच्या या फोटोला आले आहेत.