..अन् 'बिग बॉस १५'च्या सेटवर शहनाजसोबत सलमानचेही डोळे पाणावले

'बिग बॉस १५'च्या ग्रँड फिनाले एपिसोडमध्ये शहनाजची हजेरी
Salman Khan, Shehnaaz Gill
Salman Khan, Shehnaaz Gill

'बिग बॉस १५' (Bigg Boss 15) सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून ग्रँड फिनालेच्या एपिसोडमधील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉसची माजी स्पर्धक शहनाज गिलने (Shehnaaz Gill) बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावली आणि मंचावर सलमान खानला (Salman Khan) भेटताच ती भावूक झाली. ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये शहनाजला पाहुणी म्हणून बोलावण्यात आलं आहे. मंचावर तिने सूत्रसंचालक सलमानची भेट घेतली आणि त्याला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 'तुम्हाला पाहून मी भावूक झाले', असं ती सलमान म्हणते. त्यानंतर दोघं एकमेकांची गळाभेट घेतात. शहनाजची गळाभेट घेतल्यानंतर सलमानच्याही डोळ्यात पाणी आल्याचं पहायला मिळतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

शहनाज बिग बॉसच्या सेटवर काही महिन्यांपूर्वी आली होती. त्यावेळी तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासुद्धा होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सिद्धार्थचा मृत्यू झाला होता. बिग बॉस १३ मध्ये शहनाज आणि सिद्धार्थ यांची भेट झाली होती. या शोदरम्यान दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं.

Salman Khan, Shehnaaz Gill
"असे शंभर सलमान मी उभे करेन, माझी गल्ली झाडायला"; अभिजीत बिचुकले भडकला

शहनाज आणि सिद्धार्थने बिग बॉसचा तेरावा सिझन गाजवला होता. या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी 'सिडनाझ' असं नाव दिलं होतं. सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा देत शहनात ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये खास गाणं गाणार आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com