सलमानच्या त्या एका मराठी शब्दाने चांगलाच घोळ घातला;पहा व्हिडीओ

'बिग बॉस 15' च्या एका भागात करणसाठी तेजस्वीच्या आईवडिलांकडे केली मराठीत लग्नाची बोलणी
Karan Kundra,Salman Khan,Tejasswi Prakash
Karan Kundra,Salman Khan,Tejasswi PrakashGoogle

हिंदी बिग बॉस(Big boss) सिझन 15 चा फिनाले आता जवळ येतोय. 'टिकट टू फिनाले'साठी घरातील सदस्यांमध्ये चाललेली कांटे की टक्कर आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत. अनेक वादांनी यंदाचा सिझनही चांगलाच रंगला. पण वादांसोबतच दरवेळेला बिग बॉसच्या घरात एखादी तरी प्रेमकहाणी फुललेली दिसतेच. या सिझनमध्येही पंजाबी मुंडा करण कुंद्रा(Karan Kundra) आणि मराठी मुलगी तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash) यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. या दोघांनीही याला सहमती दर्शवली. काही कारणांमुळे दोघांचं ब्रेकअप होता होता वाचलं हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. आता हे प्रकरण दोघाच्या घरच्यांपर्यंत पोहोचलंय. नॅशनल टेलिव्हिजनवर या दोघांमधील जवळीकता पाहिल्यावर हे लपून तर राहणार नव्हतंच.

'बिग बॉस'च्या एका भागात तेजस्वी प्रकाशचे आईवडिल व्हिडीओ कॉलद्वारे शो मध्ये सामिल झाले होते. तेव्हा सलमानने(Salman Khan) थेट त्यांना करणवरनं प्रश्न केला की,''करण तुम्हाला कसा वाटतो? जावई पसंद आहे का?'' त्यावर सध्या तेजस्वीच्या प्रेमापोटी मराठी शिकत असलेल्या करणनेही मराठीतनंच तेजस्वीच्या आईवडिलांना विचारणा केली. अर्थात तेजस्वीच्या आईवडिलांनीही मुलगा पसंद आहे असं बोलून सहमती दर्शवली. पण तितक्यात करण मराठीत तेजस्वीच्या आईवडिलांना म्हणाला,''काका बसूया आणि बोलूया''. हे म्हणताना त्याच्या हाताचे हावभाव दर्शवत होते की बसूया म्हणजे मद्यप्राशन करायला बसूया. हे पाहून सारेच हसायला लागले. तेव्हा मध्यस्थी करताना सलमान पटकन बोलून गेला,''पहा तुमचा बेवडा जावई काय म्हणतोय''. त्यावेळी तेजस्वीच्या वडिलांनी जरी बसूया म्हणून म्हटलं असलं तरी सलमानचा ''जावई बेवडा'' हे त्यांना खटकले असावे. शेवटी कोणत्या बापाला आवडेल त्याच्या जावयाला बेवडा म्हटलेलं. असो,हे सगळं मस्करी-मस्करीत झालं असल्यामुळे आपण त्या व्हिडीओचा आनंद नक्कीच घेऊ शकता. तो व्हिडीओ इथे बातमीत जोडत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com