Cannes वरुन परत येताच अभिषेकला मिळाली वाईट बातमी, सोशल मीडियावर झाला व्यक्त Abhishek Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhishek Bachchan Mourns Akbar Shahpurwala

Cannes वरुन परत येताच अभिषेकला मिळाली वाईट बातमी,सोशल मीडियावर झाला व्यक्त

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी(Cannes Film Festival) फ्रान्सला गेला होता. कान्स निमित्तानं या कुटुंबानं एक छोटा फॅमिली हॉलिडे देखील मस्त एन्जॉय केलेला आपण सगळ्यांनीच फोटोच्या माध्यमातून पाहिला असेल. पण कान्सवरुन भारतात परत येताच अभिषेक बच्चनला एका वाईट बातमीनं सुन्न केलं. या बातमीनं अभिषेकला खूप दुःखी(Sad) केलं आहे.

हेही वाचा: पंचायत 2: 'मंजू देवी-प्रधानजी' 40 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल झाला अन्...

अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या दुःखद बातमीविषयी सांगितलं आहे. अभिषेक बच्चननं पोस्टमध्ये सांगितलं आहे की,''अकबर शाहपुरवालांचे (Akbar Shahpurwala) निधन झाले आहे. अकबर शाहपुरवाला प्रसिद्ध सूट स्टायलिस्ट होते''. मुंबईतील घरी पोहोचताच अभिषेकला त्यांच्या निधनाचं वृत्त कळालं. अकबर आणि अभिषेक बच्चनं यांचं खूप जवळचं नातं होतं. अभिषेक बच्चनने अकबर यांच्या आठवणीत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. त्यानं म्हटलं आहे की,अकबरनेच त्याच्यासाठी पहिला सूट बनवला होता

हेही वाचा: Abhay Deol: दिग्दर्शकानं पसरवली होती घाणेरडी अफवा; अभिनेत्याचा मोठा खुलासा

अभिषेकनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,''घरी आल्यावर एक वाईट बातमी कळाली. अकबर शाहपुरवाला जे सिनेइंडस्ट्रीतलं एक नामवंत व्यक्तीमत्त्व होतं ते आता आपल्यात राहिले नाहीत. मी त्यांना 'अक्की अंकल' म्हणून हाक मारायचो. त्यांनी माझ्या वडिलांचे देखील कॉस्च्युम बनवले होते. माझे वडील बऱ्याचदा सूट घालतात. माझ्या देखील अनेक सिनेमांचे सूटही त्यांनीच बनवले होते. माझ्या पहिल्या सूटला देखील त्यांनीच कापलं होतं,शिवलं होतं. तो सूट माझ्याकडे अजूनही आहे. मी 'रिफ्युजी' सिनेमाच्या प्रीमियरला तो घातला होता. त्यांचं ज्याच्यावर मनापासून प्रेम असायचं त्याच्या सूटचा कपडा ते स्वतःच्या हाताने कापायचे. ते नेहमी मला म्हणायचे,तुझ्या सुटसाठी कपडा कापायचा म्हणजे माझ्यासाठी फक्त शिवणकाम नाही,तर माझ्या भावना त्यात असतात. जेव्हा तू मी बनवलेला सूट घालतोस तेव्हा त्या प्रत्येक टाक्यात माझं प्रेम आणि आशीर्वाद असतो. माझ्यासाठी ते जगातले सर्वात उत्तम सूट मेकर होते''.

हेही वाचा: करण जोहरवर भडकला पाकिस्तानी गायक; कायदेशीर कारवाईची दिली धमकी

या पोस्टसोबत अभिषेक बच्चनने एका सूटचा फोटोदेखील शेअर केला आहे ज्यावर अकबर लिहिलं आहे. अकबर शाहपुरवालाच्या निधनावर बॉलीवूड सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त केलं आहे. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा,करण जोहर सर्वांनीच अभिषेक बच्चनच्या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सर्वांनीच आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून अकबर शाहपुरवाला यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली आहे.

Web Title: Abhishek Bachchan Mourns Akbar Shahpurwala Who Made His First Suit And Dad Amitabhs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top