
सलमान खान 'नो एंट्री'च्या सीक्वलमध्ये दिसणार? अभिनेत्याने दिले संकेत
सलमान खान सध्या दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपचा चित्रपट 'विक्रांत रोना'ला खूपच प्रमोट करत आहे. नुकतेच चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात सलमानने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या पुढील प्रोजेक्ट्सविषयी काही हिंट दिले आहे. सलमानचे चाहते काही वर्षांपासून २००५ मधील हिट 'नो एंट्री' च्या सीक्वलची प्रतिक्षा करत होते. दिग्दर्शक अनिस बझमी यांच्या या विनोदी चित्रपटामुळे प्रेक्षक चित्रपटगृहातून हसतानाच बाहेर पडल्याचे दिसले.(Salman Khan Undirectly Hints No Entry Sequal With Aneer Bazmeer)
हेही वाचा: आलिया भटचा 'चन्ना मेरेया' गाण्यावर डान्स, रणवीर सिंग पाहातच राहिला
अनिस बझमी यांच्या भूल भुलैया २ (Bhool Bhulaiyaa2) खूपच हिंट झाला. चित्रपटाच्या प्रोमोशनच्या वेळी त्यांनी संकेत दिले होते, की सलमान खान (Salman Khan) डिसेंबरमध्ये 'नो एंट्री' सीक्वलवर काम सुरु करु शकतात. आता 'विक्रांत रोना'च्या इव्हेंट दरम्यान सलमान याने या चित्रपटाबाबत मोठी हिंट दिली आहे. 'विक्रांत रोना'च्या इव्हेंटमध्ये 'नो एंट्री'चे दिग्दर्शक अनिस बझमी यांच्या उपस्थितीकडे लोकांचे लक्ष गेले.
हेही वाचा: कारण रेस्टाॅरंटही कधी बार..., काॅमेडियनचा स्मृती इराणींना खोचक टोला
सलमानने त्यांना ना केवळ आमंत्रित केले, तर प्रसारमाध्यमांसमोर त्यांच्याविषयी तो बोलला. अनिसकडे पाहात सलमान म्हणाला, येथे असे लेखक-दिग्दर्शक बसलेले आहेत. १००-१०० कोटी रुपयांचे हिंट देणारे व्यक्ती आहेत. तेही काॅमेडीत. उद्या मीही 'नो एंट्री'तून ३०० कोटी रुपये देईल. सलमानच्या या वक्तव्याने 'नो एंट्री' सीक्वल कन्फर्मचे संकेत मानले जात आहे.
Web Title: Salman Khan Undirectly Hints No Entry Sequal With Aneer Bazmeer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..