कारण रेस्टाॅरंटही कधी बार..., काॅमेडियनचा स्मृती इराणींना खोचक टोला | Smriti Irani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Irani

कारण रेस्टाॅरंटही कधी बार..., काॅमेडियनचा स्मृती इराणींना खोचक टोला

अभिनेता कमाल आर खान (KRK) नेहमी आपल्या वक्तव्य आणि ट्विटवरुन वादात अडकलेला असतो. राजकीय असो किंवा बाॅलीवूडच्या कलाकारांवर टीकास्त्र सोडत असतो. आता पुन्हा एकदा केआरकेने ट्विट करुन हरियाणा सरकारवर निशाणा साधला आहे. केआरके ट्विटमध्ये म्हणतो, हरियाणाचे बहुतेक मुलं शिक्षणासाठी विदेशात जाऊ इच्छित आहेत. कारण त्यांना हरियाणात भविष्य दिसत नाही. दुसरीकडे अनेक आई-वडील आपल्या मुलांच्या विदेशी जेवणासाठी आपली संपत्ती विकत आहेत. यातून दिसते की भारत अमृतकाळाच्या युगात आहे. (Comedian Rajeev Nigam Criticize Smriti Irani Over Bar Allegation)

हेही वाचा: मला वाचवा ! असे म्हणत उर्वशी रौतेलाने डिलीट केला व्हिडिओ, चाहते कोमात

काॅमेडियन राजीव निगमने (Rajeev Nigam) स्मृती इराणींविषयी (Smriti Irani) आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजीवने स्मृती इराणी वादाशी संबंधित रेस्टाॅरंटचे पोस्टर शेअर करुन लिहिले, की कारण रेस्टाॅरंटही कधी बार होता. यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. पंकज ठाकूर नावाचा यूजर म्हणतो, हरियाणाच्या जवळपास प्रत्येक घरातून सैन्यात एक जण जातो. हे कोण सांगणार? हरियाणा देशभक्तीत सर्वात वर आहे.

हेही वाचा: Sonalee Kulkarni : परीक्षकाच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी

फक्त हरियाणातील नव्हे तर देशभरातील आई-वडीलही मुलांच्या शिकण्यासाठी कर्ज काढून दुसऱ्या देशात पाठवतात, असा दुसरा यूजर म्हणाला. स्मृती इराणीची मुलगी गोव्यात एक रेस्टाॅरंट आणि बार चालवत आहे. त्यासाठी तिने अवैधरित्या परवाना प्राप्त केल्याचा, आरोप काँग्रेसने (Congress Party) केला आहे. हे आरोप स्मृती इराणीने फेटाळले असून म्हणाल्या, की त्यांची मुलगी शिकत असून ती आता १८ वर्षांची आहे.

Web Title: Comedian Rajeev Nigam Criticize Smriti Irani Over Bar Allegation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top