Salman Khan: अखेर प्रेमचं लग्न होणार! सलमानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

Salman Khan
Salman Khan Esakal

Salman Khan: सध्या बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा बिग बॉस ओटीटीमुळे चर्तेत आहे. पहिल्यांदाच तो हा सिझन होस्ट करत आहे.

घरातील सदस्यांचा चांगला क्लासही घेत आहे. नुकताच ईदच्या दिवशी त्याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलिज झाला.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र हा चित्रपट समिक्षक आणि प्रेक्षकांना भारसा आवडला नाही.

Salman Khan
Urfi Javed On Ameesha Patel: '25 वर्ष काम मिळालं नाही म्हणुन ती ..', उर्फीनं घेतला अमिषासोबत पंगा

आता पुन्हा सलमान त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. सलमानला बॉलिवूडमधला प्रेम म्हणुनही ओळखला जातो. त्याचे बऱ्याच चित्रपटात प्रेम नाव आहे. आता या प्रेमचं लग्न होणार आहे. मात्र ते चित्रपटात..

Salman Khan
Manoj Muntashir: आदिपुरुषचा वाद करियरला नडला! मनोज मुंतशीरला शोमधूनच काढला

सलमानने त्याचा मित्र सूरज बडजात्यासोबत हातमिळवणी केल्याच्या बातम्या समोर येत आहे. सलमान बडजात्याच्या 'प्रेम की शादी' या चित्रपटात दिसणार आहे. 'प्रेम की शादी' या चित्रपटाची शूटिंग तो लवकरच सुरू करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सलमान खान आणि सूरज बडजात्या यांनी यापूर्वीचा सुपरहिट चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' केला होता. 2015 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट खुपच हिट झाला. त्याने बॉक्स ऑफिसवर 218.91 कोटी कमाई केली होती.

Salman Khan
Ameesha Patel: 'OTT प्लॅटफॉर्मवर फक्त LGBTQ कटेंट' अमिषाचं वक्तव्य चर्चेत

बडजात्या यांचं राजश्री प्रॉडक्शन फॅमिली ड्रामा चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा 'प्रेम की शादी' हा चित्रपट देखील याच थीमवर असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि सूरज बडजात्या यांच्या टीमने चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनवर काम सुरू केले असून ऑगस्ट महिन्यापासून त्याचे शूटिंग सुरू होणार आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'टायगर 3' आणि 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. हे दोन्हा अॅक्शन चित्रपट असेल. त्यातच आता सलमान 'प्रेम की शादी' या चित्रपटातुन त्याच्या जुन्या रोमँटिक अंदाजात दिसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com