esakal | Video : सलमानसमोर विकीने कतरिनाला घातली लग्नाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

salman vicky katrina

Video : सलमानसमोर विकीने कतरिनाला घातली लग्नाची मागणी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री कतरिना कैफ Katrina Kaif १६ जुलै रोजी तिचा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर कतरिनाच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या शुभेच्छांसोबतच कतरिनाचे काही जुने फोटो आणि व्हिडीओसुद्धा पुन्हा व्हायरल होऊ लागले आहेत. यापैकी अशाच एका मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal हा कतरिनाला लग्नाची मागणी घालताना दिसतोय, ते सुद्धा सलमान खानसमोर Salman Khan. एका पुरस्कार सोहळ्यातील हा प्रसंग आहे आणि त्यावर सलमानची काय प्रतिक्रिया होती, हे पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल! (Salman Khans reaction to Vicky Kaushal marriage proposal to Katrina Kaif watch video slv92)

या व्हिडीओत मंचावर कतरिना आणि विकी कौशल एकत्र दिसत आहेत. "तू विकी कौशलसारखा एखादा चांगला मुलगा शोधून त्याच्याशी लग्न का करत नाहीस", असा गमतीशीर प्रश्न तो कतरिनाला विचारतो. त्यावर कतरिनाला 'काय?', असा प्रतिप्रश्न विचारते आणि विकी 'मुझसे शादी करोगी' हे सलमानचं गाणं गाऊ लागतो. हे ऐकून पुढे कतरिना म्हणते, 'माझ्यात हिंमत नाही.' यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेला सलमान त्याची बहीण अर्पिता खानच्या खांद्यावर डोकं टेकतो.

हेही वाचा: 'आमचं घर म्हणजे,भांडणाचा अड्डा आहे का?' सलमान संतापला

विकी कौशल आणि कतरिनाच्या नात्याविषयी अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धनने मोठा खुलासा केला होता. विकी-कतरिना एकमेकांना डेट करत असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. २०१९ मध्ये एका मित्राच्या दिवाळी पार्टीत विकी आणि कतरिना पहिल्यांदा एकत्र झळकले होते. तेव्हापासून या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं.

कतरिना आणि विकी यांना विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या दोघांनी एकत्र पार्टी केल्याच्याही चर्चा होत्या. विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने अलिबागमधल्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होते. तर दुसरीकडे कतरिनाने अलिबागमधील फोटो पोस्ट केले होते. कतरिनाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये मागील काचेवर विकीचं प्रतिबिंब चाहत्यांनी पाहिलं होतं. तो फोटो व्हायरल होताच, कतरिनाने सोशल मीडियावरून तो फोटो डिलिट केला होता. कतरिनाच्या घरी झालेल्या ख्रिसमस पार्टीलाही विकीने हजेरी लावली होती.

loading image