
मूसेवालाच्या हत्येनंतर 'भाईजान'च्या सुरक्षेत वाढ
पंजाबी गायक सिद्धधू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचें नाव समोर आलं आहे. या घटनेनंतर बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याच्या वैयक्तिक सुरक्षेशिवाय पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवतीही कडक सुरुक्षा व्यवस्था ठेवली आहे.
हेही वाचा: सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्याने एकेकाळी सलमानला देखील मारण्याची धमकी दिली होती
प्रसिद्ध पंजाबी गायक शुभदीप सिंह सिद्धू म्हणजेच सिद्धू मूसेवालाची रविवारी खूलेआम गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मानसा जिल्ह्यातील जवाहरके या त्याच्या गावातचं हा हल्ला झाला. AK-४७ चा वापर करुन ३० ते ४० गोळ्या झाडत मुसेवालाची निर्घृण हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रारने घेतली आहे.
त्याच्या हत्येनंतर बिश्नोई ग्रुपने २०१८ मध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला दिलेले धमकीचे प्रकरण ताजे झाले. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूसेवालाच्या हत्येनंतर यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या घराबाहेरही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ अधिकारीही याबाबत सातत्याने माहिती घेत आहेत. पोलीस पूर्ण सतर्क आहेत.
हेही वाचा: KK च्या मृत्यूनंतर पत्नी कृष्णाच्या 'त्या' पेंटिंगची चर्चा
सलमानला दिली होती धमकी
लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला तो २०१८ मध्ये. लॉरेन्स बिश्नोईने संपत नेहराला अभिनेता सलमान खानला मारायला सांगितले होते.
यामागचं कारण म्हणजे सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. लॉरेन्स हा स्वतः बिश्नोई समाजाचा आहे ज्यांच्यासाठी काळवीट खूप महत्वाचे मानले जाते. सलमान खानला मारून लॉरेन्स बिश्नोईला काळवीटाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. बिश्नोई आणि नेहरा यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल करत जून २०१८ मध्ये त्यांना बेंगळुरू येथून अटक करण्यात आली होती.
Web Title: Salman Khans Security Increased Suspect In Sidhu Moosewala Shooting Threatened Him In 2018
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..