Anand Mahindra : '...तर माणेकशॉ यांना स्कॉर्पिओ एसयुव्हीची सफर घडवली असती'! आनंद महिंद्रांची खास पोस्ट

आनंद महिंद्रा म्हणाले की, भारताचे महान सैनिक. मला त्यांना भेटण्याचा योग आला होता. ९० च्या दशकांत त्यांच्याशी भेट झाली होती.
Sam Bahadur Anand Mahindra Collaborates Vicky Kaushal
Sam Bahadur Anand Mahindra Collaborates Vicky Kaushalesakal

Sam Bahadur Anand Mahindra Collaborates Vicky Kaushal : प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या सॅम बहादूर या सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकची जोरदार चर्चा आहे. विकी कौशलनं माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटानं आणि खासकरुन विकीच्या भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या सगळ्यात देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या एक्सवरील पोस्टची चर्चा आहे. त्यांनी सॅम माणेकशॉ यांना आदरांजली वाहिली आहे. भारताच्या सैन्य दलात देखील उत्तम गुणवत्तेच्या एसयुव्ही असाव्यात असा माणेकशॉ यांचा आग्रह होता. असे महिंद्रा यांनी त्यांच्या त्या पोस्टमधून सांगितले आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

आनंद महिंद्रा म्हणाले की, भारताचे महान सैनिक. मला त्यांना भेटण्याचा योग आला होता. ९० च्या दशकांत त्यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी ते मला म्हणाले होते की, भारताच्या सैन्यदलाला दमदार एसयुव्हीची गरज आहे. आता जर माणेकशॉ असते तर मी त्यांना नव्या स्कॉर्पिओ एन ची सफर घडवून आणली असती. अशा शब्दांत महिंद्रा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विकीनं सर सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. विकीचा तो लूक, त्याची देहबोली याचे तुफान कौतुक होताना दिसत आहे. यापूर्वी सॅम माणेशॉचा जो ट्रेलर प्रदर्शित झाला होता त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या सगळ्यात प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या एक्सवरील पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी त्यांच्या स्कॉर्पिओ एन आणि ६ व्या शीख बटालियन रेजिमेंटविषयीचा अनुभव सांगितला आहे.

Sam Bahadur Anand Mahindra Collaborates Vicky Kaushal
Shyamchi Aai Review: श्यामची आई पाहायला जाताय? तर मग हे एकदा वाचाच!

विकी कौशलचा सॅम बहादूर हा १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी रणबीर कपूरचा बहुचर्चित असा अॅनिमल देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रणबीरचा ब्रम्हास्त्रनंतर मोठा चित्रपट म्हणून अॅनिमलकडे पाहिले जाते. सॅम बहादूरमध्ये सान्या मल्होत्रानं सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा सना शेखनं इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

सॅम बहादुर या चित्रपटाविषयी आणखी सांगायचे झाल्यास त्यात प्रसिद्ध अभिनेता नीरज काबी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची भूमिका साकारली आहे. तर एडवर्ड सोनेब्लिक यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत गोविंद नामदेव आणि मोहम्मद झिशान अयुब हा यहाया खान यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com