Bollywood News : 'अ‍ॅनिमल'ला फाईट तर दिलीच पण 'डंकी-सालार' पुढेही 'सॅम बहादूर' नाही झुकला!

मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर चित्रपटावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Sam Bahadur Total Box Office Collection Day 25 Vicky Kaushal
Sam Bahadur Total Box Office Collection Day 25 Vicky Kaushalesakal

Sam Bahadur Total Box Office Collection Day 25 Vicky Kaushal : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला गेलेला अभिनेता आहे. त्याच्या मनमर्जिया, सरदार उधमसिंग, मसान, राझी या चित्रपटांमधील भूमिकांचे कौतुक झाले होते. बॉलीवूडमधील व्हर्सेटाईल अभिनेता म्हणून विकीचे नाव घेतले जाते.

मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर चित्रपटावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित सॅम बहादूरनं बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम केल्याचे दिसून आले आहे. खरं तर या चित्रपटाच्या जोडीला रणबीर कपूरचा अॅनिमल प्रदर्शित झाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर सहाशे कोटींपेक्षा जास्त कमाई करुन तुफान लोकप्रियता मिळवली होती.

भलेही रणबीरच्या अॅनिमलच्या तुलनेत विकीच्या सॅम बहादूरची कमाई कमी असली तरी देखील त्यानं आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर किंग खान शाहरुखचा डंकी आणि प्रभासचा सालार धुमाकूळ घालत आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशात विकीची सॅम बहादूर अजुनही प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसतो आहे.

सॅम बहादूरनं जगभरातून आता शंभर कोटींचा टप्पा पार केल्याचे दिसून आले आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार सॅम बहादूरनं गेल्या २५ दिवसांमध्ये शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे. फिल्मचे टोटल कलेक्शन ८५ कोटी ५ लाख रुपये एवढे आहे. तर जगभरातून कमाईचा आकडा ११८ कोटी ५० लाख रुपये एवढा आहे.

Sam Bahadur Total Box Office Collection Day 25 Vicky Kaushal
Ranbir - Alia Daughter Raha: आलिया - रणबीरने ख्रिसमसच्या मुहूर्तावर दाखवला लेकीचा चेहरा, व्हिडीओ व्हायरल

विकीच्या सॅम बहादूरला आयएमडीबीकडून ८.२ असे रेटिंग मिळाले आहे तर जरा हटके जरा बचके ला ६.५ असे रेटिंग मिळाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सॅम बहादूरचे बजेट ५५ कोटी इतके होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com