esakal | समंथा पतीपासून दूर मुंबईत राहणार का? चर्चांवर अभिनेत्रीचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha Akkineni

समंथा पतीपासून दूर मुंबईत राहणार का? चर्चांवर अखेर सोडलं मौन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू Samantha Ruth Prabhu हिने नुकतंच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी तिने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून समंथा आणि तिचा पती नाग चैतन्य Naga Chaitanya यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. या चर्चांवर तिने उत्तर दिलं नाही. मात्र पतीपासून दूर मुंबईत राहणार का, या प्रश्नावर तिने अखेर मौन सोडलं. समंथा सध्या हैदराबादमध्ये राहत आहे. मात्र पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती मुंबईत राहणार असल्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे.

चाहत्याच्या प्रश्नावर समंथा म्हणाली, "मला कळत नाही की या अफवा कशा पसरतात? जशा इतर शेकडो अफवा पसरवल्या जात आहेत, तशीच हीसुद्धा एक अफवाच आहे. हैदराबाद माझं घर आहे आणि नेहमीच ते माझं घर राहील. हैदराबादने मला खूप काही दिलं आहे आणि मी अत्यंत आनंदाने इथे राहीन."

हेही वाचा: माझी तुझी रेशीमगाठ: शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती

समंथा आणि नाग चैतन्यच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच नाग चैतन्य तिच्यासोबत राहत नसल्याचंही म्हटलं जात आहे. तो आईवडील नागार्जुन आणि आमला यांच्यासोबत त्यांच्या घरात राहत असल्याचं कळतंय. नात्याला आणखी एक संधी देण्यासाठी समंथा आणि नाग चैतन्यने वैवाहिक सल्लागारांची मदत घेतली. मात्र हे दोघंही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं जात आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिली. घटस्फोटानंतर समंथाला जवळपास ५० कोटी रुपये पोटगी म्हणून मिळणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

loading image
go to top